Pune: "तुला परदेशातून महागडे गिफ्ट पाठवतो..." महिलेला साडेचार लाखांचा घातला गंडा
By भाग्यश्री गिलडा | Updated: July 20, 2023 15:36 IST2023-07-20T15:29:44+5:302023-07-20T15:36:05+5:30
महिलेची जेम्स विल्सन नावाच्या व्यक्तीसोबत सोशल मीडियावर ओळख झाली...

Pune: "तुला परदेशातून महागडे गिफ्ट पाठवतो..." महिलेला साडेचार लाखांचा घातला गंडा
पुणे : परदेशातून गिफ्ट पाठवले असल्याचे सांगून एका महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार नऱ्हे परिसरात घडला आहे. एका ३२ वर्षीय महिलेने पोलिसांना दिलेलय फिर्यादीनुसार, महिलेची जेम्स विल्सन नावाच्या व्यक्तीसोबत सोशल मीडियावर ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाल्यावर विल्सन याने तक्रारदार महिलेसाठी महागडे वस्तू गिफ्ट म्हणून पाठवत असल्याचे सांगितले. त्यांनतर डिलिव्हरी एजंटचा नंबर देऊन महिलेला क्लिअरन्स फी, कस्टम चार्जेस, लोकल फ्लाईट तसेच हॉटेल बिल अशी वेगवेगळी कारणे सांगून महिलेकडून एकूण ४ लाख ५० हजार रुपये उकळले.
महिलेला संशय आल्याने यासंदर्भात विचारपूस केली असता आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनतर तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत झालेल्या प्रकारचा जबाब नोंदवला. याप्रकरणी जेम्स विल्सन यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक राजूरकर पुढील तपास करत आहेत.