शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात तब्बल ३०० कोटींचा घोटाळा ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 20:05 IST

ॲड. कौस्तुभ पाटील यांनी पत्रकार परिषद घेत केला गंभीर आरोप; विद्यापीठाचे मात्र माैन

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात तब्बल ३०० कोटी रुपयांचा घाेटाळा झाल्याचा आराेप ॲड. कौस्तुभ पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे. आर्थिक अनियमितता झाल्याच्या या प्रकरणाने खळबळ उडवली असून, हा कथित गैरप्रकार कुलगुरू आणि प्र-कुलगुरू यांच्या आशीर्वादाने झाल्याचा दावाही ॲड. पाटील यांनी केला आहे.

विद्यापीठाने तृतीय श्रेणी सिव्हिल ओवरसीअर कर्मचारी विजय ढवळे यांना ३१ मार्च २०२२ रोजी स्थावर विभागाच्या कार्यकारी अभियंता पदाचा अतिरिक्त कार्यभार दिला हाेता. हा कार्यभार केवळ प्रशासकीय सोयीसाठी व तात्पुरता दिला जाऊ शकतो, मात्र विजय ढवळे यांनी मार्च २०२५ पर्यंत नियमबाह्यरित्या कार्यरत राहत विविध निविदा मंजूर केल्या आणि जवळपास ३०० कोटी रुपयांची बिले पास केली. विशेष म्हणजे १ मार्च २०२३ रोजी रवींद्र परदेशी यांची कार्यकारी अभियंता या पदावर अधिकृत नियुक्ती झाली होती, तरीही ढवळे यांनी बेकायदेशीररित्या काम सुरूच ठेवले, असा आरोपही ॲड. पाटील यांनी केला आहे. याबाबत विद्यापीठ प्रशासनाकडे विचारणा केली असता, आमचे विधी सल्लागार यावर लवकरच खुलासा करतील, असे स्पष्ट केले आहे.

तक्रारीकडे दुर्लक्ष : या प्रकरणात रवींद्र परदेशी यांनी स्वतः कुलगुरूंकडे लेखी तक्रार केली होती. तरीही कुलगुरूंनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यावरून त्यांची मूक संमती असल्याचा संशय व्यक्त होत आहे. याची सखोल चौकशी व्हावी, यासाठी महालेखापाल व आर्थिक गुन्हे शाखेकडेही तक्रार करण्यात येणार आहे. तसेच उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाणार आहे, असेही ॲड. कौस्तुभ पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड