शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सवाई गंधर्व मुंबईत नव्हे पुण्यातच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2019 20:19 IST

त्यामुळे पुण्याचा सांस्कृतिक वारसा ठरलेला '' सवाई गंधर्व महोत्सव '' मुंबईत हलवल्याची चर्चा पुण्याच्या सांस्कृतिक विश्वात सुरु झाली...

ठळक मुद्देसवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाने सांस्कृतिक विश्वात वेगळा मानदंड निर्माणमुंबईतल्या सवाई भीमसेन संगीत संमेलनात चार सत्रांमध्ये कार्यक्रम होणार

पुणे : दिग्गजांप्रमाणेच नवोदित कलाकारांना स्वरमंचावर सादरीकरणाची संधी मिळावी, यादृष्टीने आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे यावर्षी मुंबईमध्ये सवाई संगीत संमेलन आयोजिले आहे. त्यामुळे पुण्याचा सांस्कृतिक वारसा ठरलेला '' सवाई गंधर्व महोत्सव '' मुंबईत हलवल्याची चर्चा पुण्याच्या सांस्कृतिक विश्वात सुरु झाली. मात्र ती निराधार असल्याचा दावा आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे करण्यात येत आहे.  मुंबईत होणारा कार्यक्रम म्हणजे संगीत संमेलन आहे. एखाद्या शहरातील स्थानिक संस्थेच्या सहकार्याने संगीत संमेलन घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी बेळगाव, बडोदा, ठाणे, चंद्रपूर अशा विविध ठिकाणी संगीत संमेलन पार पडले आहे. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव मात्र पुण्यापुरताच मर्यादित राहील, असे मंडळाने स्पष्ट केले आहे.आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाने सांस्कृतिक विश्वात वेगळा मानदंड निर्माण केला आहे. अभिजात भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्राचा मेरुमणी असलेला सवाई महोत्सव आणि पुण्याचे अनेक वर्षांपासूनचे अतूट नाते निर्माण झाले आहे. परदेशातूनही कानसेन सवाईचा श्रवणानंद घेण्यासाठी पुण्यामध्ये येतात. आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी म्हणाले, की सांगितिक चळवळीच्या प्रसारासाठी गेल्या पंधरा वर्षांपासून विविध ठिकाणी संस्थेतर्फे सांगितिक कार्यक्रमांचे केले आहे. यापूर्वी बेळगाव, बडोदा, ठाणे, चंद्रपूर अशा विविध ठिकाणी संगीत संमेलन पार पडले आहे. त्यामुळे यंदा मुंबईत होणा-या संमेलनाची ही पहिली वेळ नाही. संमेलनातील कलाकार आणि कार्यक्रमांचे स्वरुप लवकरच जाहीर केले जाईल.गेल्या वर्षी पुण्यातील सवाई महोत्सवाचे स्थळ बदलले. सुमारे तीन दशकांपासून न्यू इंग्लिश स्कूल, रमणबागेच्या मैैदानावर सवाईचे सूर घुमत होते. सवाई, रसिक आणि रमणबागेचे मैदान असे समीकरण तयार झाले होते. गेल्या वर्षी महोत्सव मुकूंदनगर येथील कटारिया हायस्कूलच्या मैैदानावर रंगला. त्या पाठोपाठ मुंबईतल्या संगीत संमेलनाच्या नावातही सवाई असल्याची बातमी आल्याने रसिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरु झाली होती. दरम्यान, मुंबईतल्या सवाई भीमसेन संगीत संमेलनात चार सत्रांमध्ये कार्यक्रम होणार आहेत. सकाळी संगीत मार्गदर्शन आणि दुपारी शास्त्रीय संगीत विषयक ध्वनिचित्रफीत दाखवण्यात येणार आहेत. या संमेलनात भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या दुर्मिळ फोटोंचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.

ह्यह्यआर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे यावर्षी २२ ते २४ नोव्हेंबर दरम्यान मुंबईमध्ये गोरेगावमधील प्रबोधन क्रीडा भवन येथे सवाई भीमसेन संगीत संमेलन पार पडणार आहे. गेल्या वषीर्ही षण्मुखानंद सभागृहात संगीत संमेलन पार पडले होते. त्यामुळे संमेलनाचे हे पहिले वर्ष नाही.ह्णह्ण -श्रीनिवास जोशी, कार्याध्यक्ष, आर्य संगीत प्रसारक मंडळ.

टॅग्स :PuneपुणेBhimsen Joshiभीमसेन जोशीartकलाmusicसंगीत