शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सूर, ताल आणि लय यांचा त्रिवेणी संगम असलेल्या ‘सवाई’चा स्वरसोहळा आजपासून रंगणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 11:59 IST

तानसेन’ आणि ‘कानसेन’ यांच्या स्वागतासाठी स्वरमंच सज्ज

ठळक मुद्दे जुन्या-नव्या कलाकारांच्या सुरावटींनी पुढील पाच दिवस महोत्सव रंगणार परिसरात तब्बल १० हजार रसिकांची बसण्याची व्यवस्था

पुणे : पुण्याच्या सांस्कृतिक विश्वाचा मेरुमणी असलेल्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या स्वरयज्ञास मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ संकुलाच्या मैैदानावार आजपासून (दि. ११) प्रारंभ होणार आहे. आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात ‘तानसेन’ आणि ‘कानसेन’ यांच्या स्वागतासाठी स्वरमंच सज्ज झाला आहे. जुन्या-नव्या कलाकारांच्या सुरावटींनी पुढील पाच दिवस महोत्सव रंगणार आहे.सूर, ताल आणि लय यांचा त्रिवेणी संगम असलेल्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे हे ६७वे वर्ष आहे. आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणारा ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ यावर्षी ११ डिसेंबरपासून सुरु होत आहे. या महोत्सवासाठी २७० बाय २२८ फूट इतका मांडव तयार करण्यात आला आहे. परिसरात तब्बल १० हजार रसिकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. भारतीय बैठक आणि खुर्च्या अशा स्वरूपात ही बैठक व्यवस्था असणार आहे. याशिवाय संपूर्ण मंडपात लावलेल्या ६ एलईडी स्क्रीन्सवर देखील रसिकांना महोत्सवाचा आस्वाद घेता येणार आहे.बुधवारी (दि. ११) दुपारी ४ वाजता महोत्सवाच्या स्वरसोहळयास प्रारंभ होईल. सवाई गंधर्व यांचे ज्येष्ठ शिष्य व किराणा घराण्याचे जेष्ठ गायक पं. फिरोज दस्तूर यांचे शिष्य गिरीश संझगिरी यांच्या गायनाने ६७व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला सुरुवात होईल. हे वर्ष पं. फिरोज दस्तूर यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. याचे औचित्य साधत त्यांचे शिष्य असलेले संझगिरी त्यांना आदरांजली वाहतील. यानंतर जयंती कुमरेश यांचे कर्नाटकी शैलीतील वीणावादन होईल. यानंतर पं. माणिक वर्मा यांच्या शिष्या असलेल्या अर्चना कान्हेरे यांचे गायन होईल. पहिल्या दिवसाचा समारोप ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरासिया यांच्या बासरी वादनाने होईल.तत्पूर्वी सकाळच्या सत्रात दिवस ‘षड्ज’ अंतर्गत ‘पंडित रामनारायण - अ ट्रिस्ट विथ सारंगी’ (दिग्दर्शक - व्ही. पाकिरीसामी) व ‘उस्ताद अमीर खाँ’ (दिग्दर्शक - एस. एन. शास्त्री) हे लघुपट दाखवले जाणार आहेत. ‘अंतरंग’ या उपक्रमाअंतर्गत बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरासिया यांची मुलाखत मुलाखतकार अमरेंद्र धनेश्वर घेणार आहेत. गणेशखिंड रस्त्यावरील राहुल थिएटर शेजारील सवाई स्मारक येथे सकाळी १० ते १२ या वेळेत ‘षड्ज’ आणि ‘अंतरंग’ हे कार्यक्रम पार पडतील. -----------आज महोत्सवात :गिरीश संझगिरी (गायन)जयंती कुमरेश (वीणा वादन)अर्चना कान्हेरे (गायन)पं. हरिप्रसाद चौरासिया (बासरी वादन)------------महोत्सवाची वेळ ११ ते १३ डिसेंबर - दुपारी ४ ते रात्री १० १४ डिसेंबर - दुपारी ४ ते रात्री १२  १५ डिसेंबर - दुपारी १२ ते रात्री १० 

टॅग्स :PuneपुणेBhimsen Joshiभीमसेन जोशीmusicसंगीतartकला