७ ते ११ डिसेंबर रंगणार 'सवाई गंधर्व' महोत्सव
By Admin | Updated: October 7, 2016 15:10 IST2016-10-07T15:10:38+5:302016-10-07T15:10:38+5:30
आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणारा 'सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव' यंदा दि. ७ ते ११ डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे.

७ ते ११ डिसेंबर रंगणार 'सवाई गंधर्व' महोत्सव
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ७ - आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणारा 'सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव' यंदा दि. ७ ते ११ डिसेंबर दरम्यान न्यू इंग्लीश स्कूल, रमणबाग येथे आयोजित करण्यात येणार आहे.
महोत्सवाचे यंदाचे हे ६४ वे वर्ष असून यावर्षी हा महोत्सव चार ऐवजी पाच दिवस होणार आहे. दरवर्षी शेवटच्या दिवशी होणारे रविवार सकाळचे सत्र यावर्षी रद्द करीत, महोत्सव पाच दिवस केवळ सायंकाळच्याच सत्रात आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी कळविली आहे.