शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

एकदम कडssक; पुणे विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्याचा ड्रेसकोड पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2019 13:05 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११४ वा पदवीप्रदान सोहळा आज पार पडत आहे. या समारंभासाठी यंदापासून ड्रेसकोड बदलण्यात आला आहे.

ठळक मुद्देसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११४ वा पदवीप्रदान सोहळा १ लाखांहून अधिक पदवी प्रमाणपत्र प्रदान

पुणे : सावित्रीबाई फुलेपुणे विद्यापीठाचा ११४ वा पदवीप्रदान सोहळा आज पार पडत आहे. या समारंभासाठी यावर्षीपासून ऑफ व्हाईट क्रीम कलरचा झब्बा अथवा नेहरू शर्ट, पांढऱ्या रंगाचा पायजमा, उपरणे, फक्‍त मान्यवरांसाठी पूर्वीप्रमाणेच पगडी असा पोशाख आहे. या बदलावरून अनेक मत-मतांतरे व्यक्त झाली होती.  सीएसआयआरचे महासंचालक डॉ. शेखर मांडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पदवीप्रदान सोहळा पार पडत आहे. समारंभात पदक आणि पुरस्कार मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अंगात कुर्ता-पायजमा हा पारंपरिक पोषाख आहे. मात्र डोक्यावर ब्रिटीश पद्धतीची गोल टोपी होती. पण पारंपारिक पोषाखावर पुणेरी पगडी घालण्यास काही विद्यार्थी संघटनांनी विरोध केल्याने वाद रंगला.

यंदा १ लाखांहून अधिक पदवी प्रमाणपत्र प्रदान 

पदवीप्रदान समारंभात विविध विद्या शाखांमधील पदव्युत्तर स्तरावरील एकूण 21 हजार 366  पीएचडीच्या 441 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप केले जाणार आहे. 70  सुवर्णपदक प्रदान केले जाणार आहे. त्यानंतर पदवी स्तरावरील 80 हजार 613 विद्यार्थ्यांची पदवी प्रमाणपत्रे त्यांच्या महाविद्यालयांकडे पाठवण्यात येणार आहेत. ती त्यांना महाविद्यालयांमधून मिळतील.

विद्यार्थ्यांचा बदललेल्या ड्रेस कोडला अल्प प्रतिसाद

यंदापासून काळ्या गाऊन ऐवजी ऑफ व्हाईट क्रीम कलरचा झब्बा अथवा नेहरू शर्ट, पांढऱ्या रंगाचा पायजमा, उपरणे असा ड्रेसकोड ठेवण्यात आला. मात्र या सोहळ्यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी बदललेल्या ड्रेसकोडला अत्यंत अल्प प्रतिसाद दिला आहे. काही विद्यार्थी तर जुनाच काळा गाऊन घालून फोटो काढत असल्याचे चित्र दिसून आले.

- पदवी प्रदान सोहळ्यात मान्यवरांना पुणेरी पगडी ठेवण्यात आल्याने विद्यार्थी संघटनांकडून निदर्शने- विद्यार्थ्यांची धरपकड सुरू, पदवी प्रदान समारंभात तणावाचे वातारवरण- पोशाख पेशवाईच्या काळातील करण्यात आल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप-  लोकतांत्रिक जनता दल, एसएसयुआय, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडून पेशवाई पोशाखाचा निषेध- गाढवांना पुणेरी पगडी घालून समारंभात सोडणार, पोलीस बंदोबस्त वाढवला

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठSavitri Bai Phuleसावित्रीबाई फुले