''या'' तारखेला होणार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी निवडणूका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2019 03:20 PM2019-08-01T15:20:57+5:302019-08-01T15:25:43+5:30

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थी निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. विद्यापिठाकडून महाविद्यालयांमधील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

Savitribai Phule Pune University Student Election to be held on this date | ''या'' तारखेला होणार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी निवडणूका

''या'' तारखेला होणार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी निवडणूका

Next

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातीलविद्यार्थी निवडणुकांचा बिगुल वाजलं आहे. विद्यापीठाकडून महाविद्यालयांमधील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून दि. ७ सप्टेंबरला मतदान होणार आहे. तर त्याचदिवशी मतमोजणी होऊन निकाल घोषित केला जाईल. यानंतर विद्यापीठ विद्यार्थी परिषदेची निवडणुक होणार आहे. दि. २४ सप्टेंबर रोजी मतदान तर दि. २७ सप्टेंबर रोजी मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
मागील काही वर्षांपुर्वी बंद करण्यात आलेल्या विद्यार्थी निवडणुका यंदा पुन्हा होणार आहेत. विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाच्या संचालकांनी बुधवारी रात्री उशिया या निवडणुकांचे वेळापत्रक प्रसिध्द केले. त्यानुसार विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये, संस्था व विभागांमधील विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकांची अधिसुचना दि. २१ ऑ गस्ट रोजी प्रसिध्द केली जाणार आहे. दि. २९  ऑगस्ट रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणे, ५ सप्टेंबरला अर्ज माघारी घेणे आणि उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द केली जाईल. त्यानंतर दि. ७ सप्टेंबर रोजी सर्व महाविद्यालयांमध्ये मतदान होईल. संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य सलग ४ तासांची मतदानाची वेळ निश्चित करतील. मतदानांतर महाविद्यालयातच मतमोजणी करून लगेच निकाल घोषित केला जाईल.
महाविद्यालयांमधील निवडणुका झाल्यानंतर लगेच दि. ९ सप्टेंबरला विद्यापीठ विद्यार्थी परिषदेची निवडणुक अधिसुचना प्रसिध्द केली जाईल. दि. १४ व १५ सप्टेंबरला अर्ज दाखल करणे, दि. १९ व २० सप्टेंबरला अर्ज माघारी घेणे, दि. २४ सप्टेंबर मतदान तर दि. २७ सप्टेंबरला मतमोजणी व निकाल असा निवडणुक कार्यक्रम असेल. ही मतमोजणी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमध्ये होईल. 

  • महाविद्यालय विद्यार्थी परिषद निवडणुक वेळापत्रक

दि. २१ ऑगस्ट - निवडणुकीची अधिसुचना प्रसिध्द करणे
दि. २३  ऑ गस्ट - मागासवर्ग प्रतिनिधी ठरविण्यासाठी आरक्षण सोडत आणि तुकडीनिहाय तात्पुरती मतदार यादी प्रसिध्द करणे
दि. २६  ऑगस्ट - मतदार यादीवर लेखी आक्षेप नोंदवणे
दि. २७  ऑगस्ट - अंतिम मतदार यादी प्रसिध्द करणे
दि. २९  ऑगस्ट - उमेदवारी अर्ज दाखल करणे
दि. ३१  ऑगस्ट - अर्ज छाननी करून वैध व अवैध अर्जांची यादी प्रसिध्द करणे
दि. ३ सप्टेंबर - अर्ज वैधतेबाबत आक्षेप सादर करणे
दि. ४ सप्टेंबर - आक्षेपाबाबत सुनावणी घेणे, अपीलानंतर अंतिम अजार्ची यादी प्रसिध्द करणे
दि. ५ सप्टेंबर - अर्ज माघारी घेणे, उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द करणे
दि. ७ सप्टेंबर - मतदान, मतदानानंतर मतमोजणी व निकाल
दि. ९ ते २१ सप्टेंबर - उमेदवारांच्या खचार्चा हिशेब सादर करणे

 

  • विद्यापीठ विद्यार्थी परिषद निवडणुक वेळापत्रक

दि. ९ सप्टेंबर - निवडणुकीची अधिसुचना प्रसिध्द करणे, तात्पुरती मतदार यादी प्रसिध्द करणे
दि. ११ सप्टेंबर - मतदार यादीवर लेखी आक्षेप नोंदवणे
दि. १३ सप्टेंबर - आक्षेपांवर निर्णय घेतल्यानंतर अंतिम मतदार यादी प्रसिध्द करणे
दि. १४ व १५ सप्टेंबर - उमेदवारी अर्ज दाखल करणे
दि. १६ सप्टेंबर - अर्जांची छाननी करून वैध व अवैध अर्जांची यादी प्रसिध्द करणे
दि. १७ सप्टेंबर - अर्ज वैधतेबाबत आक्षेप सादर करणे
दि. १८ सप्टेंबर - आक्षेपांवर निर्णय घेऊन वैध व अवैध अर्जाची यादी प्रसिध्द करणे
दि. १९ व २० सप्टेंबर - अर्ज माघारी घेणे
दि. २० सप्टेंबर - पात्र उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द करणे
दि. २४ सप्टेंबर - मतदान
दि. २७ सप्टेंबर - मतमोजणी व निकाल

दि. २८ सप्टेंबर - एनएसएस/क्रीडा/एनसीसी/सांस्कृतिक यातील सदस्यांचे नामनिर्देशन करणे
दि. ३० सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर - उमेदवारांच्या खर्चाचा हिशेब सादर करणे  

Web Title: Savitribai Phule Pune University Student Election to be held on this date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.