शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पकडले चक्क दीडशे कॉपी बहाद्दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2021 22:31 IST

पुणे विद्यापीठाशी संलग्न पुणे, अहमदनगर व नाशिक या तीन जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांची ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेतली जात आहे.

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे प्रथम सत्रची परीक्षा घेतली जात असून या परीक्षेदरम्यान सुमारे दीडशे विद्यार्थी गैरप्रकार करत असल्याचे आढळून आले आहे. विद्यापीठातर्फे या कॉपीबहाद्दरांना विद्यापीठाच्या तक्रार समिती समोर उभे केले जाणार आहे. त्यामुळे ऑनलाइन परीक्षा घेतल्या जात असल्या तरी गैरप्रकार करणार्‍यांकडे विद्यापीठाच्या यंत्रणेचे बारीक लक्ष असल्याचे समोर आले आहे.

पुणे विद्यापीठाशी संलग्न पुणे, अहमदनगर व नाशिक या तीन जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांची ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेतली जात आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून दररोज सुमारे एक लाखाहून अधिक विद्यार्थी परीक्षा देत आहेत. परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जात असून त्यासाठी प्रॉक्टर्ड पद्धतीचा अवलंब केला जात आहे. त्यामुळे परीक्षेदरम्यान गैरप्रकार करणारे विद्यार्थी विद्यापीठाच्या यंत्रणेतून सुटत नाहीत.विद्यापीठाच्या परीक्षा 10 एप्रिल पासून सुरू झाले असून आत्तापर्यंत परीक्षेदरम्यान गैरप्रकार करणाऱ्या सुमारे दीडशे विद्यार्थ्यांना विद्यापीठाने पकडले आहे. एकाच दिवशी ७४ विद्यार्थी कॉपी करताना विद्यापीठाच्या प्राॅक्टर्ड यंत्रणेने शोधले आहे. त्यात अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे काही विद्यार्थी ग्रुप करून ऑनलाइन परीक्षा देत असल्याचे आढळून आले आहे. तसेच काही विद्यार्थी सोशल मीडियाच्या माध्यमातून इतर विद्यार्थ्यांना प्रश्नांची उत्तरे पाठवत असल्याचे समोर आले आहे.-----------विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षेदरम्यान सुमारे दीडशे विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले. विद्यापीठाच्या इमेज प्रॉक्टर्ड यंत्रणेतून या विद्यार्थ्यांना पकडण्यात आले. त्यांना विद्यापीठाच्या तक्रार समिती समोर उभे केले जाणार आहे. ऑनलाइन पद्धतीने परीक्षा सुरू असल्या तरी गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांवर विद्यापीठाचे लक्ष आहे.- महेश काकडे, संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

टॅग्स :Puneपुणेexamपरीक्षाStudentविद्यार्थीPune universityपुणे विद्यापीठonlineऑनलाइन