सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिकार मंडळाची आज निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 06:56 IST2018-01-22T06:56:33+5:302018-01-22T06:56:45+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यापीठ अधिसभेवरील प्राचार्य प्रतिनिधी, प्राध्यापक प्रतिनिधी, विद्या परिषद, अभ्यास मंडळांसाठी रविवार, दि. २१ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. यासाठी ४५ मतदान केंद्रांवर सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होणार आहे. पुणे, नगर व नाशिक जिल्ह्यातून एकूण १० हजार ५९४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिकार मंडळाची आज निवडणूक
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यापीठ अधिसभेवरील प्राचार्य प्रतिनिधी, प्राध्यापक प्रतिनिधी, विद्या परिषद, अभ्यास मंडळांसाठी रविवार, दि. २१ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. यासाठी ४५ मतदान केंद्रांवर सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होणार आहे. पुणे, नगर व नाशिक जिल्ह्यातून एकूण १० हजार ५९४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
अधिसभेवर प्राचार्य गटातून १० सदस्य, अध्यापक गटातून १० सदस्य, विद्यापीठ अध्यापकांतून ३ सदस्य व प्रत्येक अभ्यास मंडळावर ३ विभागप्रमुख निवडून द्यावयाचे आहेत. प्राचार्य गटातून खुल्या गटातील ५ जागांसाठी ८ उमेदवार रिंगणात
आहेत. तर राखीव जागांपैकी अनुसूचित जाती या संवर्गातून दोन उमेदवारांमध्ये लढत होत आहे. अन्य इतर मागास प्रवर्ग, महिला, भटक्या जमाती, अनुसूचित जमाती या संवर्गातील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. प्राचार्य गटासाठी ३०३ मतदार आहेत.
अध्यापक शिक्षक संघातून १० जागांसाठी मोठी चुरस आहे. या जागांसाठी स्पुक्टो-पुटा पॅनल व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शिक्षक संघ पॅनल यांनी उमेदवार उभे केले आहेत. खुल्या गटातील ५ जागांसाठी ११ उमेदवार आहेत. तर अनुसूचित जाती संवगार्तून एका जागेसाठी ६, अनुसूचित जमाती गटातून एका जागेसाठी २ उमेदवार, डीटीएनटी गटातून एका जागेसाठी ३ उमेदवार, इतर मागास प्रवगार्तून एका जागेसाठी २, तर महिला गटातून एका जागेसाठी ३ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. अध्यापक गटासाठी १० हजार २९१ मतदार आहेत.
विद्या परिषदेच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा आणि मानवविज्ञान विद्याशाखा या गटातून उमेदवार निवडणूक लढवित आहेत. विद्यापीठ अध्यापक गटातील ३ जागांसाठी मतदान होत आहे. त्यासाठी दोन्ही पॅनलकडून विजयाचा दावा केला जात आहे. विद्यापरिषदेसाठी ५ हजार ३७२ मतदार आहेत.
विद्यापीठाच्या विविध अभ्यास मंडळांच्या १८३ जागांसाठी निवडणूक होणार होती; परंतु विज्ञान तंत्रज्ञान विद्याशाखेची ६ अभ्यास मंडळे, वाणिज्यची ११, मानव्य विद्याशाखेची
५ आणि आंतरविद्याशाखेच्या २ अभ्यास मंडळांवरील ७२ जागांवर
बिनविरोध निवड झाली आहे. प्रत्येक अभ्यास मंडळ हे तीन सदस्यांचे असते. त्यामुळे अभ्यास मंडळांच्या १११ जागांसाठी निवडणूक पार पडत आहे. रविवारी मतदान पार पडल्यानंतर मंगळवार, दि. २३ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.
मतदान केंद्रात मोबाईल वापरण्यास मनाई-
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिकार मंडळाच्या निवडणुकीमध्ये मतदान केंद्राच्या आत मोबाईल अथवा इतर विद्युत संचरण उपकरणे घेऊन जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. मोबाईलमधून मतपत्रिकेचा फोटो काढताना आढळल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रभारी कुलसचिव डॉ. अरविंद शाळिग्राम यांनी स्पष्ट केले आहे.
अध्यापक शिक्षक संघातून १० जागांसाठी मोठी चुरस आहे. या जागांसाठी स्पुक्टो-पुटा पॅनल व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शिक्षक संघ पॅनल यांनी उमेदवार उभे केले आहेत.