शहरं
Join us  
Trending Stories
1
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
2
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
3
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
4
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
5
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
6
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
7
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
8
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
9
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
10
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
11
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
12
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
13
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
14
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
15
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
16
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
17
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
18
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
19
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
20
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स

हायर एज्युकेशन क्रमवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पहिला नंबर, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 02:00 IST

द टाईम्स हायर एज्युकेशन क्रमवारी : अधिक सोयी-सुविधा उपलब्ध होणे आवश्यक असल्याची विद्यार्थ्यांची मागणी

पुणे : आॅक्सफर्ड आॅफ द ईस्ट अशी ख्याती असणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने द टाईम्स हायर एज्युकेशन क्रमवारीत पारंपरिक विद्यापीठांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. इतर विद्यापीठे व शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यापीठ संयुक्तपणे सहाव्या स्थानावर आहे. विद्यापीठामध्ये करण्यात येणारं संशोधन, अभ्यासक्रम, सोयी-सुविधा यांच्या आधारे हे मानांकन देण्यात आले आहे. विद्यापीठाच्या या यशाबद्दल विद्यापीठातील विद्यार्थ्यांना काय वाटते ते आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

इंग्रजीमध्ये एम. फिल करणारा अमोल सरवदे म्हणाला, की विद्यापीठाचा पारंपरिक विद्यापीठांमध्ये प्रथम क्रमांक आला असला तरी विद्यापीठात विद्यार्थ्यांसाठी अधिक सोयी-सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे. सध्या विद्यार्थ्यांसाठी पुरेसे वसतिगृहे विद्यापीठात नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. खासकरून विद्यार्थिनींना वसतिगृह न मिळाल्यास नातेवाईकांकडे किंवा बाहेर खोली घेऊन राहावे लागते. यात त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा निर्माण होतो. संशोधनात मात्र विद्यापीठाने चांगली प्रगती केली आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविल्यास विद्यापीठाच्या संयुक्त क्रमवारीत आणखी सुधारणा होऊ शकते.पॉलिटिकल सायन्सच्या दुसºया वर्षाला असणारी रुक्साना शेख म्हणाली, की राज्यातील तसेच देशातील अन्य पारंपरिक विद्यापीठांच्या तुलनेत पुणे विद्यापीठाचा दर्जा खूप चांगला आहे. शिक्षणाच्याबाबतीत विद्यापीठ चांगली कामगिरी करत आहे. परंतु विद्यापीठ प्रशासनाने इतर गोष्टींवरसुद्धा लक्ष द्यायला हवे. विद्यापीठातील सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये अनेक असुविधा आहेत.

याबाबत आम्ही अनेक वेळा विद्यापीठ प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. परंतु विद्यापीठाकडून फारसे लक्ष दिले नाही. त्याचबरोबर विद्यापीठातील विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकीन टाकण्यासाठीची कुठलीही सोय केलेली नाही. त्यामुळे विद्यार्थिनींना अडचणींचा सामना करावा लागतो. प्रवेशप्रक्रियेमध्ये पारदर्शकता येणे आवश्यक आहे. वसतिगृहांची संख्यासुद्धा वाढवायला हवी. दर महिन्याला विज्ञान फेस्टिवल भरविण्यात येते. त्याचबरोबरविविध तज्ज्ञांना मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित केले जाते. विद्यापीठाचे शिक्षकही उत्तम शिकवतात. विद्यापीठात अनेक संशोधन केंद्रसुद्धा आहेत.अनेक गोष्टींवर विद्यापीठाने भर देणे आवश्यकपारंपारिक विद्यापीठांमध्ये पुणे विद्यापीठाने पहिला क्रमांक मिळवला, याचा आनंद आहे. परंतु अनेक गोष्टींवर विद्यापीठाने भर देणे आवश्यक आहे.खेड्यातून येणाºया विद्यार्थ्यांसाठी चांगल्या सोयी, वसतिगृह निर्माण करायला हवीत. तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाºया विद्यार्थ्यांसाठीसुद्धा विविध सोयी उपलब्ध करून द्यायला हव्यात, असे मत विद्यापीठातून डीटीडीमध्ये डिप्लोमा करणाºया सरस्वती वीरकर हिने व्यक्त केले.बायोकेमिस्ट्रीमध्ये एम. फिल करणारा नितीन कदम म्हणतो, की इतर विद्यापीठांच्या तुलनेत पुणे विद्यापीठात चांगले आणि दर्जेदार शिक्षण मिळते.संसोधनाला विद्यापीठाकडून जास्तीत जास्त प्रोत्साहन दिले जाते.

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठPuneपुणे