शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

हेल्मेटसक्तीविरोधात ‘सविनय कायदेभंग’ आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2019 17:00 IST

पोलिसांनी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून हेल्मेटसक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देमागील काही दिवसांपासून जनजागृती तसेच ठिकठिकाणी कारवाई सुरूपोलिसांनी केलेल्या वाहतुक नियमभंगाची छायाचित्रे मोठ्या प्रमाणावर अपलोड करण्याचे आवाहन दुचाकीवर जाऊन पोलिस आयुक्तांना हेल्मेट सक्ती न करण्याबाबत निवेदन दिले जाणार

पुणे : हेल्मेट न घालणाºया दुचाकी चालकांविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केल्याने हेल्मेटसक्ती विरोधी कृती समितीने ‘सविनय कायदेभंग’ आंदोलन करण्याचा निर्णय मंगळवारी घेतला. समितीच्या वतीने दि. ३ जानेवारी रोजी हेल्मेट न घालता दुचाकीवर जाऊन पोलिस आयुक्तांना हेल्मेट सक्ती न करण्याबाबत निवेदन दिले जाणार आहे. तसेच त्यानंतरही हेल्मेटसक्तीविरोधात लढा कायम ठेवण्याचा निर्धार समितीने केला.पोलिसांनी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून हेल्मेटसक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मागील काही दिवसांपासून जनजागृती तसेच ठिकठिकाणी कारवाई सुरू करण्यात आली. तर दि.१ जानेवारीपासून कारवाईचा वेग वाढविला जाणार आहे. या सक्तीला समितीकडून सुरूवातीपासूनच विरोध करण्यात आला. पण पोलिसांनी कारवाई सुरूच ठेवल्याने आता समितीकडून रस्त्यावर उतरून विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी समितीच्या बैठकीमध्ये यावर चर्चा करण्यात आली. यावेळी समितीचे अध्यक्ष सुर्यकांत पाठक, माजी महापौर अंकुश काकडे, शांतीलाल सुरतवाला, मोहनसिंग राजपाल, सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर, श्याम देशपांडे, संदीप खर्डेकर, धनंजय जाधव, मंदार जोशी आदी उपस्थित होते. याविषयी बोलताना पाठक म्हणाले, पोलिस आयुक्तांनी नागपुरमध्ये केलेला हेल्मेटसक्तीचा प्रयत्न आता पुण्यात लादत आहेत. हेल्मेटसक्तीला विरोधाची आमची भुमिका अनेक वर्षांची आहे. शहरात सुमारे २५ लाख दुचाकी आहेत. या सर्वांना हेल्मेट उपलब्ध आहेत का? केवळ दंड करून पैसे उकळण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे दि. ३ जानेवारी रोजी सविनय कायदेभंग आंदोलन केले आहे. यामध्ये हेल्मेटसक्तीला विरोध करणारे नागरिक गांजवे चौक येथील पत्रकार भवनपासून पोलिस आयुक्तालयापर्यंत दुचाकी फेरी काढतील. कोणीही दुचाकीस्वार हेल्मेट घालणार नाही. त्यानंतर पोलिस आयुक्तांना हेल्मेटसक्ती न करण्याचे निवेदन दिले जाईल. कायद्यामध्ये योग्य बदल करून नागरिकांना दिलासा देण्याचे काम खासदार, आमदारांचे आहे. त्यांच्यावर दबाव वाढविण्यासाठी नागरिकांनी हेल्मेटसक्ती विरोधी मोहिमेत सक्रीयपुणे सहभागी व्हायला हवे, असे वेलणकर यांनी सांगितले. वाहतुक पोलिसांच्या ‘सतर्क पुणेकर’ अ‍ॅपवर पोलिसांनी केलेल्या वाहतुक नियमभंगाची छायाचित्रे मोठ्या प्रमाणावर अपलोड करण्याचे आवाहन खर्डेकर यांनी केले. केवळ डोक्याला मार लागल्याने मृत्यू होण्याची प्रमाण अत्यल्प आहे. पोलिसांकडून याबाबत चुकीची माहिती देऊन दिशाभुल केली जात असल्याचा आरोप देशपांडे यांनी केला. 

टॅग्स :PuneपुणेTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस