सराफांवर लक्ष ठेवणार - सौरभ राव

By Admin | Updated: November 17, 2016 01:24 IST2016-11-17T01:24:05+5:302016-11-17T01:24:05+5:30

विधानपरिषद (स्थानिक प्राधिकारी संघ) निवडणूक निर्भय मुक्त वातारवणात पार पाडली पाहिजे. या निवडणुकीत नोटाबंदी मुळे पैशा ऐवजी सोने वाटपची शक्यता अधिक असल्याने

Saurabh Rao to watch jewelery | सराफांवर लक्ष ठेवणार - सौरभ राव

सराफांवर लक्ष ठेवणार - सौरभ राव

पुणे : विधानपरिषद (स्थानिक प्राधिकारी संघ) निवडणूक निर्भय मुक्त वातारवणात पार पाडली पाहिजे. या निवडणुकीत नोटाबंदी मुळे पैशा ऐवजी सोने वाटपची शक्यता अधिक असल्याने सोन्यांच्या व्यापा-यांकडून निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणूक कालावधीत सोने व्यापारी यांच्याकडूनही गैरव्यवहार होवू नये अशा सूचना सराफ असोशिएनच्या पदाधिकारी यांना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात विधानपरिषद निवडणुकीबाबतच्या बैठकीत मार्गदर्शन करतांना बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे उपस्थित होती. याप्रसंगी राव म्हणाले की, संबधित उमेदवार व त्यांच्या पक्षातर्फे केले जाणारे रोख रक्कमाचा मोठा आर्थिक व्यवहारावर निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार आयकर, विक्रीकर आदी संबधित विभागांनी विशेष लक्ष ठेवावे. निवडणुकीत गैरव्यवहार होवू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करुन अधिक पारदर्शकपणे काम करुन निवडणूक यंत्रणेची प्रतिमा चांगली राहिली पाहिजे याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना दिल्या. निवडणूकीच्या दरम्यान नियमबाहय होर्डिग्ज, बॅनरद्वारे राजकीय स्वरुपाच्या जाहिराती लावल्या जाणार नाहीत याकडे लक्ष द्यावे. बँकामार्फत होणा-या मोठया संशयास्पद आर्थिक व्यवहाराबाबत सतर्क रहावे. पैशाचा दुरपयोग निवडणूकीत होवू नये. विविध बँकेमार्फत नोटाची माहिती रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार करावी. तसेच त्याचा अहवालही नियमित कळविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. निवडणूक प्रक्रिया शांततेत सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे निवडणूक कालावधीसाठी नियुक्त केलेले भरारी पथके, दक्षता पथके यांनी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. बैठकीस उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी समिक्षा चंद्राकार, उपजिल्हाधिकारी मोनिका सिंह, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दिवाकर देशमुख, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Saurabh Rao to watch jewelery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.