शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पेपर फुटीच्या चौकशीसाठी सत्यशोधन समिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 13:08 IST

नुकतेच बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स शाखेच्या द्वितीय व तृतीय वर्षाचे पेपर परीक्षा सुरू होण्याच्या २० ते २५ मिनिटे अगोदर व्हाट्स अपवरुन व्हायरल झाल्याप्रकरणी तक्रार करण्यात आली आहे.

ठळक मुद्देसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : बीएस्सी कॉम्प्युटरचे फुटले पेपरसत्यशोधन समितीचा चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार

पुणे : सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाच्या बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स शाखेच्या द्वितीय व तृतीय वर्षांचा पेपर गेल्या दोन दिवसांपासून परीक्षेपूर्वीच व्हाट्स अपवरुन व्हायरल झाल्याच्या तक्रारी विद्यापीठ प्रशासनाकडे आल्या आहेत. यापार्श्वभूमीवर या पेपर फुटीच्या चौकशीसाठी सत्यशोधन समिती नेमण्यात आली आहे. या समितीचा चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे बीएस्सी, इंजिनिअरींगचे पेपर परीक्षेच्या अर्धा तास अगोदर व्हाट्स अपवरुन व्हायरल होण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. संबंधित महाविद्यालयांकडे पेपर पाठविल्यानंतर हे प्रकार होत आहेत. नुकतेच बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स शाखेच्या द्वितीय व तृतीय वर्षाचे पेपर परीक्षा सुरू होण्याच्या २० ते २५ मिनिटे अगोदर व्हाट्स अपवरुन व्हायरल झाल्याप्रकरणी तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे याप्रकरणाच्या चौकशीसाठी लासलगाव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिनेश नाईक यांची सत्यशोधन समिती नेमण्यात आली. पेपर फुटीच्या तक्रारी आल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने सुरूवातीला पेपर फुटलेच नसल्याची भुमिका घेतली होती. जे पेपर व्हाट्स अपवरुन व्हायरल झाले ते मागील वर्षीचे असल्याचे स्पष्टीकरण विद्यापीठाकडून देण्यात आले होते. मात्र मनविसेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी याप्रकरणी फुटलेल्या पेपरचे पुरावे विद्यापीठ प्रशासनाकडे सादर केले. नाशिकमधील एका महाविद्यालयातून हे पेपर फुटल्याचे कोड नंबरवरून दिसून येत आहे. यापार्श्वभुमीवर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या समितीच्या चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल असे परीक्षा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.बीएस्सी पेपर फुटीचे प्रकरण ज्या महाविद्यालयामध्ये घडले तिथल्या परीक्षा केंद्र प्रमुखांवर फौजदारी गुन्हा दाखल करून संबंधित महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्राची मान्यता काढून घ्यावी अशी कल्पेश यादव यांनी केली आहे. 

टॅग्स :Puneपुणेuniversityविद्यापीठscienceविज्ञानexamपरीक्षाnitin karmalkarनितीन करमळकरWhatsAppव्हॉट्सअॅप