शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Satish Wagh Case : 'सुपारी फक्त हातपाय तोडण्याची होती, पण आमदाराचा अँगल आला आणि..', सतीश वाघ हत्या प्रकरणात नवीन खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 14:23 IST

मारेकऱ्यांना जेव्हा सतीश वाघ हे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा आहेत असे समजले अन्...

- किरण शिंदे

पुणे - सतीश वाघ खून प्रकरणात पुणेपोलिसांनी त्यांची पत्नी मोहिनी वाघ हिला अटक केली. मोहिनी वाघ सध्या पोलिस कोठडीत आहे. पोलिसांच्या चौकशीतून या प्रकरणात दररोज नवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची आणि चक्रावून टाकणारी माहिती समोर आली आहे. सुरुवातीला सतीश वाघ यांचे फक्त हात पाय तोडण्याची सुपारी देण्यात आली होती. मात्र मारेकऱ्यांना जेव्हा सतीश वाघ हे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा आहेत असे समजले. त्यानंतर त्यांनी त्यांचा खून केला. त्यांच्या शरीरावर तब्बल ७२ वार करण्यात आले होते. 

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील अनेक वर्षांपासून वाघ पती-पत्नीत वाद होते. सतीश वाघ यांची देखील बाहेर अनैतिक संबंध असल्याचे त्यांच्या पत्नीने सांगितले. तर मोहिनी वाघ यांचे देखील अक्षय जावळकर या शेजारीच राहणाऱ्या तरुणासोबत संबंध होते. यावरून वाघ दांपत्यात सतत वाद व्हायचे. सतीश वाघ हे पत्नीला मारहाण करायचे. तर घर खर्चासाठी पैसेही देत नव्हते. यावरून मोहिनी वाघ आतल्या आत धुमसत होत्या. त्यामुळेच त्यांनी सतीश वाघ यांचा काटा काढण्याचा ठरवलं. प्रियकर अक्षय जावळकर याच्या मदतीने तिने पाच लाख रुपयांची सुपारी दिली होती. 

मात्र ही सुपारी फक्त सतीश वाघ यांचे हातपाय तोडून त्यांना अपंग करण्याची होती. हात पाय तुटल्यानंतर तो घरात बसेल, त्यानंतर घरातील सर्व आर्थिक व्यवहार आपल्या ताब्यात येतील.. आणि आपल्याला त्याला सांभाळता येईल असा विचार म्हणून वाघ हिने केल्याचे चौकशीत समोर आले आहे. आणि त्या दृष्टीने मारेकऱ्यांना देखील सांगत आले होते. मात्र ९ डिसेंबर रोजी पहाटे सतीश वाघ यांची अपहरण झाले आणि त्यानंतर मारेकऱ्यांना सतीश वाघ हे आमदाराचे मामा असल्याचे समजले. आरोपींनी सतीश वाघ यांच्यावर ७२ वार करून संपवले. 

दरम्यान मोहिनी वाघ हिने यापूर्वीही एका व्यक्तीला सतीश वाघ यांना ठार मारण्यासाठी सुपारी देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर तिने अक्षय जवळकर यांच्या मदतीनेच संपूर्ण कट रचला आणि अमलात आणला. मोहिनी वाघ हिला पुणे पोलिसांनी अटक केली असून ३० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या खून प्रकरणात तिच्याकडे चौकशी सुरू असून या चौकशीतून दररोज धक्कादायक आणि चक्रावणारी माहिती समोर येत आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस