शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

माणुसकी हरवली..! ससून रुग्णालयात पाय गमावलेला रुग्ण व्हीलचेअर न मिळाल्याने सरपटत गेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 19:18 IST

ससून रुग्णालयातील ही घटना आरोग्य व्यवस्थेतील हलगर्जीपणाचे आणि अमानवतेचे चित्र पुन्हा समोर आणते. 

पुणेमाणुसकी हरवली का? असा सवाल पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. अपघातात एक पाय गमावलेला रुग्ण उपचारासाठी ससूनमध्ये दाखल झाला होता. उपचारानंतर त्याला घरी सोडण्यात आले, मात्र रुग्णालयाकडून व्हिलचेअर तर दूरच, कुणी मदतीसुद्धा पुढे आले नाही. त्यामुळे रुग्णाला स्वतःच जमिनीवर सरपटत  रुग्णालयाच्या वार्डमधून बाहेर पडावे लागले. याचा हृदयद्रावक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.याआधीच आर्थिक अडचणींमुळे वेळेवर उपचार न मिळाल्याने एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, ससून रुग्णालयातील ही घटना आरोग्य व्यवस्थेतील हलगर्जीपणाचे आणि अमानवतेचे चित्र पुन्हा समोर आणते. 

व्हिलचेअरचा अभाव की निष्काळजीपणा? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. रुग्णावर उपचार झाले, पण रुग्णालय प्रशासनाने त्याला बाहेर जाण्यासाठी व्हिलचेअर उपलब्ध करून दिली नाही. हा रुग्ण एका पायाने अपंग असूनही त्याला जमिनीवर घासत घरी जावे लागले, हे पाहून नागरिक संतप्त झाले आहेत.ससून  सुधारणार नाहीअशी तीव्र प्रतिक्रिया आता स्थानिकांकडून येत आहे. ससून रुग्णालयातील वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. ही माणसं आहेत की दानव? असा सवाल या व्हिडिओवर विचारण्यात येत आहे. आरोग्य प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी सर्वत्र होत आहे.  

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडhospitalहॉस्पिटल