शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

ससूनच्या 'कोविड' रुग्णालयाला अखेर मुहूर्त; उद्यापासून रुग्ण होणार दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2020 20:30 IST

ससून रुग्णालयातील जुन्या इमारतीमधील कक्षासह नायडू रुग्णालयावर येणारा ताणही कमी होणार

ठळक मुद्देमागील जवळपास १२ वर्षांपासून ससून रुग्णालयासाठी नवीन इमारत उभारणीची काम सुरू अतिदक्षता विभाग सोमवार (दि. १२) पासून सुरू होण्याची शक्यता

पुणे : ससून रुग्णालयाच्या ११ मजली नवीन इमारतीमध्ये कोविड रुग्णालय सुरू करण्यास अखेर मुहूर्त मिळाला आहे. रविवार (दि. १२) पासून या इमारतीमध्ये तपासणीसाठी येणाऱ्या संशयित रुग्णांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यास सुरूवात केली जाणार आहे. तर अतिदक्षता विभाग सोमवार (दि. १२) पासून सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ससून रुग्णालयातील जुन्या इमारतीमधील कक्षासह नायडू रुग्णालयावर येणारा ताणही कमी होणार आहे.मागील जवळपास १२ वर्षांपासून ससून रुग्णालयासाठी नवीन इमारत उभारणीची काम सुरू आहे. निधीअभावी हे काम रखडले आहे. पण कोरोनामुळे या इमारतीमध्ये कोरोनाचे रुग्ण दाखल करण्यासाठी जिल्हा प्रशासन व राज्य शासनाने पावले उचलली. त्यानुसार इमारतीमध्ये आवश्यक सुविधा तातडीने निर्माण करण्यास सुरूवात झाली. तसेच हे रुग्णालय कोविड रुग्णालय म्हणून निश्चित करण्यात आले. त्यानुसार या रुग्णालयामध्ये केवळ कोरोना रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष तसेच अतिदक्षता विभाग उभारण्याचे काम मागील काही दिवसांपासून सुरू होते. सुरूवातीला या इमारतीमध्ये फ्लु ओपीडी सुरू करण्यात आली. पण प्रत्यक्ष रुग्ण दाखल केले जात नव्हते. सुविधा उभारण्याला विलंब होत असल्याने अखेर जुन्या इमारतीतील २७ क्रमांकाच्या वॉर्डमधील टीबीच्या रुग्णांना हलवून तिथे कोरोना रुग्णांची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर वॉर्ड क्रमांक २८ ताब्यात घेण्यात आला. सध्या या दोन्ही वॉर्डमध्ये ४० हून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत.नवीन इमारतीमध्ये सध्या ५० बेडचा अतिदक्षता विभाग व १०० बेडचा विलगीकरण कक्ष उभारण्यात येत आहे. रविवारी दुपारनंतर विलगीकरण कक्षामध्ये संशयित रुग्णांना दाखल करण्यास सुरूवात केली जाणार आहे. तर कोरोना लागण झालेल्या रुग्णांना सोमवारपासून अतिदक्षता विभागात दाखल केले जाईल. त्यानंतर आवश्यकतेनुसार बेडची संख्या वाढविली जाणार आहे. या इमारतीत केवळ कोरोनाबाधित व संशयित रुग्ण असतील, अशी माहिती सुत्रांनी दिली. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी याला दुजोरा दिला.----------------

टॅग्स :Puneपुणेsasoon hospitalससून हॉस्पिटलCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdoctorडॉक्टर