शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
3
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
4
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
5
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
6
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
7
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
8
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
9
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
10
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
11
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
12
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
13
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
14
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
15
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
16
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
17
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
18
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
19
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
20
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा

नातेवाईकाला भेटायला ससूनमध्ये आला अन दुचाकी चोर बनला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 12:42 IST

ससून परिसरातून सहा, हडपसर, निगडी, स्वारगेट तसेच सातार्यातून त्याने दुचाकी चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे...

पुणे : लॉकडाऊनच्या काळात तो आजारी असलेल्या नातेवाईकाला भेटण्यासाठी तो ससून रुग्णालयात आला. मेन गेटसमोर लावलेल्या दुचाकीवर त्याचे लक्ष गेले. त्याने ऑगस्ट २०२१ मध्ये पहिली दुचाकी चोरली. ही चोरी पचल्यावर त्याची हिमंत वाढत गेली आणि तो विविध ठिकाणी पार्क केलेल्या दुचाकी चोरु लागला. बंडगार्डन पोलिसांनी या दुचाकी चोरट्याला पकडून त्याच्याकडून १३ दुचाकी हस्तगत केल्या. अख्तर चांद मुजावर (वय ४४, रा. मु. पो. बनवडी, ता. कोरेगाव, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

अख्तर मुजावर हा सेटिंगचे काम करीत होता. लॉकडाऊनमध्ये त्याचे काम बंद होते. ऑगस्ट २०२१ मध्ये तो एका नातेवाईकाला भेटण्यासाठी ससून रुग्णालयात आला आला होता. तेव्हा त्याने येथील एक दुचाकी चोरुन नेली होती. त्यानंतर त्याने ससून रुग्णालयाबरोबरच शहरातील अन्य ठिकाणाहून दुचाकी वाहने चोरली होती.

हॉटस्पॉटवरुन चोरल्या ६ दुचाकी-

ससून रुग्णालयाच्या मेनगेटसमोरून आतापर्यंत अनेक दुचाकी चोरीला गेल्या आहेत. पोलीस उपनिरीक्षक राहुल पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी हॉटस्पॉट असलेल्या या परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज गोळा केले. तेव्हा वाहन चोरी झालेल्या वेळेच्या दरम्यान, एक व्यक्ती सातत्याने जवळपासच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याचे दिसून आले. जवळपास २०० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यावर पोलीस अमंलदार सुधीर घोटकुले व सागर घोरपडे यांना अख्तर मुजावर यानेच दुचाकी चोरल्याची माहिती मिळाली. त्याच्याकडे करण्यात आलेल्या तपासात त्याने चोरलेल्या १३ दुचाकी काढून दिल्या.

ससून परिसरातून सहा, हडपसर, निगडी, स्वारगेट तसेच सातार्यातून त्याने दुचाकी चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलिस आयुक्त चंद्रकांत सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक यशवंत गवारी, गुन्हे निरीक्षक अश्विनी सातपुते, पोलिस उपनिरीक्षक राहुल पवार, मोहन काळे, अमंलदार फिरोज शेख, हरिष मोरे, प्रताप गायकवाड, अनिल वणवे यांनी ही कारवाई केली.

ससूनमध्ये वारंवार दुचाकीच्या चोरीच्या घटना घडत असल्याने तब्बल २०० सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर गुन्ह्यात एकच आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. त्याचा माग काढून त्याला अटक करण्यात आली. त्याने ह्या दुचाकी राहत्या घरा जवळ आणि हॉटेलच्या परिसरात पार्क करून ठेवल्या होत्या. त्याच्याकडे गाड्यांची कागदपत्रे नसल्याने त्याला या गाड्या विकता आल्या नाही. 

-सागर पाटील, पोलिस उपायुक्त

टॅग्स :PuneपुणेtheftचोरीCrime Newsगुन्हेगारीsasoon hospitalससून हॉस्पिटल