शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

तुम्हीही बनू शकता ‘देवदुत’...:ससून रुग्णालयामध्ये प्रशिक्षण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 5:22 PM

वैद्यकीय मदत मिळेपर्यंत प्रथमोपचार म्हणून ‘सीपीआर’चे महत्व जागतिक पातळीवर मान्य करण्यात आलेले आहे. त्यामुळे याबाबतचे शास्त्रशुध्द प्रशिक्षणही दिले जाते. 

पुणे : विमानामध्ये एका प्रवाशाचे बंद पडलेले हृदय पुन्हा सुरू करून त्यांना डॉक्टरांनी जीवनदान दिले. पण या विमानात डॉक्टर नसते तर... कोणत्याही ठिकाणी असा प्रसंग ओढावू शकतो. तिथे डॉक्टर असतीलच असे नाही. सर्वसामान्य नागरिकांनाही जीवन संजीवनी अर्थात कार्डिओपल्मनरी रेस्युसीटेशन (सीपीआर) देऊन बंद हृदय सुरू करता येते. तुम्हीही डॉक्टरांप्रमाणे ‘देवदुत’ बनू शकता. ससून रुग्णालयामध्ये नुकतेच सर्वसामान्यांसाठी याचे प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. 

               नागपुर ते पुणे यादरम्यानच्या विमान प्रवासात ससून रुग्णालयातील बालरोग विभागातील सहयोगी प्राध्यापक व सीपीआर केंद्राचे संचालक डॉ. उदय राजपूत यांनी एका प्रवाशाचे प्राण वाचविले. कोल्हापूर येथील अशोक जाधव (वय ५८ वर्षे) यांना हृदयविकासाचा झटका आला होता. डॉ. राजपुत यांनी तातडीने ‘सीपीआर’ सुरू केल्याने जाधव यांचे हृदयाचे ठोके पुन्हा सुरू झाले. डॉ. राजपुत हे ‘सीपीआर’चे प्रशिक्षक आहेत. त्यामुळे त्यांना हे शक्य झाले. असे प्रसंग दैनंदिन जीवनात कुठेही, कोणत्याही वेळी घडू शकतात. पण प्रत्येक ठिकाणी असे डॉक्टर असतीलच असे नाही. एखाद्याला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तातडीने ‘सीपीआर’ देणे सर्वसामान्य नागरिकांनाही शक्य आहे. वैद्यकीय मदत मिळेपर्यंत प्रथमोपचार म्हणून ‘सीपीआर’चे महत्व जागतिक पातळीवर मान्य करण्यात आलेले आहे. त्यामुळे याबाबतचे शास्त्रशुध्द प्रशिक्षणही दिले जाते. 

         भारतामध्ये इंडियन अ‍ॅकॅडमी ऑफ पेडियाट्रिक आणि अमेरिकन हार्ट असोसिएशनने तयार केलेल्या कोर्सद्वारे प्रशिक्षण देण्यात येते. देशात अ‍ॅकॅडमीद्वारे केवळ ३५ केंद्रांना राष्ट्रीय पातळीवर मान्यता आहे. त्यामध्ये आता ससून रुग्णालयाचाही समावेश झाला आहे. राज्यामध्ये ससूनसह केवळ चारच अशी केंद्र आहेत. ससूनमध्ये २०१५ पासून असे प्रशिक्षण दिले जाते. पण आतापर्यंत प्रामुख्याने डॉक्टर, नर्सेससाठीच हे प्रशिक्षण होते. त्यासाठी प्रत्येकी किमान २०० रुपये शुल्क घेतले जाते. एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिपच्या कालावधीत तीन तासांचे प्रशिक्षण बंधनकारक आहे. केंद्राला आता राष्ट्रीय मान्यता मिळाल्याने सर्वसामान्यांना प्रशिक्षण देण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. प्रशिक्षणासाठी आवश्यक प्रौढांच्या २० आणि लहान मुलांच्या २० मानवी ‘डमी’ मदतरुपाने मिळाल्या आहेत.

प्रतिक्रिया 

सर्वसामान्यांनी ३ ते ४ तासांचे प्रशिक्षण घेतल्यानंतर तेही ‘सीपीआर’ देऊन प्राण वाचवू शकतात. किमान ३० ते ४० जणांचा गट असल्यास त्यांना एकत्रितपणे मोफत प्रशिक्षण देणे शक्य आहे. रुग्णालयातील केंद्रामध्ये त्यासाठी सर्व सुविधा आहेत. तसेच इतर ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध असल्यास तिथेही हे प्रशिक्षण दिले जाऊ शकते. बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. आरती किणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आठ जण प्रशिक्षण देतात. 

- डॉ. उदय राजपूत, संचालक, सीपीआर केंद्र, ससून रुग्णालय

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्यHeart Attackहृदयविकाराचा झटकाHeart Diseaseहृदयरोगsasoon hospitalससून हॉस्पिटल