शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

'सारथी' संस्थेचा डोलारा केवळ ७ कर्मचाऱ्यांवर उभा; अनेक महत्त्वाचे प्रकल्पही कर्मचारी कपातीमुळे बंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2020 13:28 IST

आरक्षणावरून वाद सुरू असताना, मराठा समाजाच्या हितासाठी सुरू झालेल्या सारथी संस्था देखील ओढून ताणून सुरू आहे.

ठळक मुद्देशासनाच्या आदेशामुळे सारथी संस्थेतील तब्बल २५ -३० कर्मचाऱ्यांची कपात संस्थेचे पन्नास कोटीचे बजेट आणले १५ कोटींवर 

सुषमा नेहरकर- शिंदे पुणे : मराठा आरक्षणावरून वाद सुरू असताना , मराठी समाजाच्या हितासाठी सुरू झालेल्या सारथी संस्था देखील ओढून ताणून सुरू आहे. शासनाच्या आदेशामुळे सारथी संस्थेतील तब्बल २५ -३० कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली आहे. यामुळे सध्या केवळ ७ कर्मचाऱ्यांवर संस्थेचा डोलारा उभा आहे. परंतु कर्मचारी कपातीमुळे संस्थेतील अनेक महत्त्वाचे विभाग बंद पडले आहेत. मराठी समाजातील तरुण मुला-मुलींच्या हितासाठी बार्टी, यशदा सारख्या संस्थांच्या धर्तीवर तत्कालीन सरकारने ‘सारथी’ या स्वयत्त संस्थेची स्थापन केली होती. परंतु राज्यात महाआघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर ‘सारथी’ संस्थेची स्वयत्ता काढून घेण्यात आली. त्यानंतर हा प्रश्न चांगलाच गाजत आहे. महाआघाडी शासनाने सारथी संस्थेची स्वयत्ता तर काढून घेतलीच, परंतु संस्थेच्या कर्मचाऱ्यांमध्ये देखील 90 टक्के कपात केली. सारथी संस्था सुरू होऊन एक -दीड वर्षेच झाले असले तरी मराठा समाजातील तरुण-तरुणींसाठी अनेक प्रकल्प सुरू केले होते. सारथी संस्थेच स्वतंत्र युपीएससी-एमपीएसी कक्ष, संशोधन कक्ष, ग्रंथालयासह अनेक विभाग सध्या कर्मचारी अभावी बंद पडले आहे. यामध्ये मराठा समाजाची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक स्थितीची वस्तुनिष्ठ आकडेवारी गोळा करण्याचे काम देखील संस्थेमार्फत सुरू होते. मराठा समाजाला मिळालेले आरक्षण कायम ठेवण्यासाठी या आकडेवारीचा शासनाला खूप उपयोग झाला असता,पण हा प्रकल्प देखील बंद पडला आहे. ----- संस्थेचे पन्नास कोटीचे बजेट आणले १५ कोटींवर सारथी संस्थेच्या वतीने मराठा समाजातील मुला-मुलींसाठी सीएम फेलोशिप, छत्रपती शाहूमहाराज फेलोशिप, युपीएसीसी, एमपीएससीसाठी क्लास फी व दिल्लीमध्ये मोफत प्रशिक्षण देण्यात येत होते. संस्थेला केवळ फेलोशिपसाठी दर वर्षी २४-५० कोटींचा निधी लागतोय. पण सध्या कोरोना आणि आर्थिक अडचण सांगत शासनाने संस्थेच्या ५० कोटींच्या निधीत कपात करून थेट १५ कोटीवर आणला आहे. 

टॅग्स :PuneपुणेMaratha Reservationमराठा आरक्षणStudentविद्यार्थीState Governmentराज्य सरकार