सराईत चोरटे अखेर जाळ्यात
By Admin | Updated: July 9, 2014 23:50 IST2014-07-09T23:50:02+5:302014-07-09T23:50:02+5:30
शहराच्या विविध भागांमध्ये शस्त्रच्या धाकाने; तसेच मारहाण करून जबरी चोरी करणा:या चोरटय़ांना गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने जेरबंद केले.

सराईत चोरटे अखेर जाळ्यात
पुणो : शहराच्या विविध भागांमध्ये शस्त्रच्या धाकाने; तसेच मारहाण करून जबरी चोरी करणा:या चोरटय़ांना गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने जेरबंद केले. चोरटय़ांकडून 6 जबरी चो:या, 1 घरफोडी आणि 2 वाहन चो:या उघडकीस आणण्यात यश आले असून, 2 लाख 5क् हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी दिली.
लखन बालाजी कांबळे (वय 2क्, रा. न:हे), आकाश विश्वनाथ काळरामे (वय 19, रा. पोकलेचाळ, वडगाव बुद्रुक) अशी अटक आरोपींचे नाव आहे. पथकाचे पोलीस शिपाई विनोद साळुंके यांना आरोपींबाबत खब:यामार्फत माहिती मिळाली होती. त्यानुसार या दोघांना पोलिसांनी उचलले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर, आरोपींनी वारज्यामध्ये जबरी चोरी करून मोबाईल लंपास केल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यातील 34 हजारांचा एक मोबाईल हस्तगत केला. तसेच, आरोपींनी चोरलेले 15 मोबाईल, 2 दुचाकी असा 2 लाख 5क् हजारांचा ऐवज हस्तगत केला आहे.
आरोपींचा म्होरक्या जयेश भुरूक (रा. मोहिनीकुंज, सिंहगड रस्ता) हा पसार झाला आहे.
ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील पाटील, सहायक निरीक्षक राजन जगदाळे, उपनिरीक्षक उत्तमराव भुदगुडे, विलास पालांडे, दत्तात्रय कोल्हे, पोलीस कर्मचारी नासीर
पटेल, एजाज शिलेदार, संतोष पागार, संजय दळवी, शरद कणसे, राजेंद्र
शिंदे, किरण लांडगे, हरिभाऊ रणपिसे, विनोद साळुंके, सोमनाथ बो:हाडे,
हेमंत खरात यांनी केली. (प्रतिनिधी)
4आरोपी रात्री-बेरात्री वाहन चालकांना किंवा गाडीवरून जाणा:या जोडप्यांना लुटत असत. विशेषत: पाठीमागे बसलेल्या महिलेच्या पाठीवर थाप मारून पर्स, बॅग लंपास करीत असत.