शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Sant Tukaram Maharaj Palkhi 2025: वरूणांचा अभिषेक, टाळ-मृदंगे, वीणा झंकारती, तुकोबांच्या अंगणी वैष्णव नाचती!

By विश्वास मोरे | Updated: June 18, 2025 13:58 IST

मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारावरील फुलातील दोन मोर, संत तुकाराम महाराजांची फुलातील प्रतिकृती लक्षवेधी होती

देहूगाव (पुणे) : यंदा जोरदार पाऊस झाल्याने अभूतपूर्व उत्साहात संतश्रेष्ठ जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा बुधवारी सुरू झाला आहे.  ‘‘इंद्रायणीतीरी टाळ-मृदंग वाजती, वीणा झंकारती, वरूणराजाचा अभिषेक होऊनी,  तुकोबांच्या अंगणी वैष्णव नाचती.’’ अशी अपूर्व अनुभूती देहूनगरीत येत आहे. आषाढी वारीमुळे  वारकरी वर्गात उत्साह आणि चैतन्याचे वातावरण होते.

आषाढीवारीसाठी मंगळवारी सांयकाळीच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दिंडेकरी, दिंड्या, फडकरी, वारकरी देहूनगरीत दाखल झाले होते. त्यामुळे इंद्रायणी हरीभजन आणि भक्तीरसाने न्हाहून निघाली होती. पालखी प्रस्थान सोहळा आज असल्याने भल्या सकाळीच वारकऱ्यांनी इंद्रायणी स्रान केले. सकाळपासूनच आज वातावरण ढगाळ होते. तर अधून-मधून पावसाच्या हलक्या सरी बसरत होत्या. प्रस्थान सोहळ्याच्या परंपरेनुसार पहाटे पाचला श्री विठ्ठल रुक्मीणी मंदिरात व शीळा मंदिरात महापूजा झाली. त्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजता तपोनिधी पालखी सोहळ्याचे जनक नारायण महाराजांच्या समाधिची व सात वाजता वैंकुठगमण मंदिरात महापूजा संस्थानचे विश्वस्थांच्या हस्ते झाली.

कडेकोट बंदोबस्त, मंदिर सजविले मोहक पुष्पांनी

सकाळपासूनच मुख्यमंदिरात दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. तर संपूर्ण मंदिर परिसर सुगंधी फुलांनी सजविला होता. मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारावरील फुलातील दोन मोर, संत तुकाराम महाराजांची फुलातील प्रतिकृती लक्षवेधी होती. मंदिरपरिसरात कडेकाट बंदोबस्त ठेवला होता. तसेच वाहतूक विभागाच्या वतीने नियोजन केले होते. इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.  त्यामुळे नदीपात्रामध्ये वारकऱ्यांना सोडण्यात येत नव्हते. सोहळ्यावर सीसीटीव्हीची नजर असून, दर्शन बारी ग्रामपंचायत पर्यंत पोहोचली आहे. 

तुकोबांच्या अंगणी वैष्णवांनी खेळ मांडला

उन सावल्यांचा खेळ सुरू झाला. प्रस्थानाची वेळ झाल्याने तसाच मुख्यमंदिरात दिंड्या जागा घेऊ लागल्या.  आसमंती भगव्या पताका फडकावीत वैष्णवांची पावले मंदिराच्या दिशेने पडू लागली. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगळेच चैतन्य होते. 

दुपारी अडीचच्या सुमारास प्रस्थान सोहळ्यास सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंदिरात येऊन दर्शन घेतले. प्रस्थान सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे सोहळ्यासाठी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर अधून मधून वरूणांचाही अभिषेक सुरू आहे. टाळमृदंगाचा कल्लोळ टीपेला पोहोचला आहे.

टॅग्स :PuneपुणेSant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळाsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीAshadhi Ekadashiआषाढी एकादशी २०२५ashadhi wariआषाढी एकादशी वारी 2025Pandharpurपंढरपूरdehuदेहू