शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

Ashadhi Wari: ज्ञानोबांनी घेतला खंडेरायाचा निरोप; लाखो वैष्णव अन् माऊलींचे वाल्हेकडे प्रस्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 16:02 IST

सकाळी ७ वाजता हस्ते माऊलींच्या पादुकांची पूजा केल्यानंतर सोहळ्याने जेजुरी मुक्काम हलवून वाल्हेकडे प्रस्थान ठेवले

जेजुरी : पंढरीत आहे रखुमाई ,येथे म्हाळसा बानाई, तेथे विटेवरी उभा, इथे घोड्यावरी शोभा।           तेथे पुंडलीकनिधान, इथे हेगडी प्रधान ।          तेथे बुक्क्याचे रे लेणे, इथे भंडार भूषणे ।         तेथे वाहे चंद्रभागा, इथे जटी वाहे गंगा ।  तेथे मृदंग वीणा टाळ, इथे वाघ्या मुरुळीचा घोळ ।अशा टाळ मृदंगाच्या तालात लोकप्रिय ओव्या गात वैष्णवांनी आज जेजुरीचा निरोप घेतला. सकाळी ७ वाजता हस्ते माऊलींच्या पादुकांची पूजा केल्यानंतर सोहळ्याने जेजुरी मुक्काम हलवून वाल्हेकडे प्रस्थान ठेवले. सकाळी साडे नऊ वाजता सोहळा सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील दौडज खिंडीत न्याहारीसाठी विसावला होता. या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरातून  शेतकरी कुटुंबांची भाजी भाकर,आणि सामाजिक संस्थांकडून वाटप करन्यात आलेले न्याहारीचे पदार्थांवर  कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी ।लसूण मिरची कोथंबीरी, अवघी व्यापिली पंढरी । या संत सावतामाळी यांच्या अभंगातील ओव्या गात वैष्णवांनी ताव मारला. संपूर्ण डोंगर परिसरात ठिकठिकाणी विसावलेले वैष्णवांचे जथ्थे हे दृश्य अत्यंत नयनरम्य दिसत होते. तासाभराचा न्याहारीचा विसावा उरकून सोहळ्याने वाल्हेकडे कूच केले.

टॅग्स :ashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022sant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीSocialसामाजिकAshadhi Ekadashiआषाढी एकादशी