शहरं
Join us  
Trending Stories
1
Lionel Messi : Video - मेस्सी आला, ५ मिनिटांत गेला, फॅन्सचा पारा चढला; खुर्च्या फेकल्या, स्टेडियममध्ये तोडफोड
2
मेस्सीला पाहण्यासाठी इतकं महागडं तिकीट, राज्यपाल संतापले; राज्य सरकारकडून मागवला रिपोर्ट
3
वेगळ्या विदर्भावरून महाविकास आघाडीत जुंपली; संजय राऊतांचा वार, विजय वडेट्टीवारांचा पलटवार
4
Lionel Messi: फुटबॉलचा 'GOAT' मेस्सीच्या ७० फूट उंच पुतळ्याचे व्हर्च्युअल अनावरण
5
भारतीय क्रिकेटमध्ये पुन्हा मॅच फिक्सिंगचं थैमान, या चार खेळांडूंना केलं, सस्पेंड, FIRही दाखल
6
Messi India Tour: १०० कोटींचे जेट, १०० कोटींचे घर... लियोनेल मेस्सीची नेटवर्थ किती? फुटबॉलचा जादूगार भारताच्या दौऱ्यावर
7
अरेरे! इन्स्टावरचं प्रेम पडलं महागात; बॉयफ्रेंडशी लग्न करण्यासाठी दिल्लीहून रायबरेलीला आली पण...
8
'धुरंधर'मधल्या या अभिनेत्रीला लूक्सवरुन ऐकावे लागलेले टोमणे, नाक आणि दात बदलण्याचा मिळालेला सल्ला
9
आलिशान घर, राईस मिल, पेट्रोल पंप... अधिकाऱ्याकडे सापडलं ४० लाखांसह कोट्यवधींचं घबाड
10
पुढील ३ वर्षांत २ IPO आणण्याची रिलायन्सची तयारी; पाहा काय आहे मुकेश अंबानींचा प्लॅन
11
"मला फक्त माझ्या मुलाची परीक्षा..."; रात्रभर ८०० किमी कार चालवणाऱ्या वडिलांची हृदयस्पर्शी गोष्ट
12
केरळमध्ये ३ महापालिकांच्या मतमोजणीत काँग्रेस आघाडीवर; तिरुवनंतपुरमला NDA आणि LDF मध्ये चुरस
13
एका गंभीर विषयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र; काय घडलं?
14
८५ लाख मतदारांच्या वडिलांच्या नावात गडबड, १३ लाख जणांचे आई-वडील एकच, बंगालमधील SIR मधून धक्कादायक माहिती समोर
15
Crime: प्रेयसीनं संबंध तोडल्यानं भडकला प्रियकर, घरात घुसून तिच्यावर झाडल्या गोळ्या!
16
अमेरिकेकडून भारतावर लावलेलं टॅरिफ हटवण्याची मागणी; शुल्काला थेट आव्हान, खासदारांनी संसदेत मांडला प्रस्ताव
17
शुक्र गोचर २०२५: वर्षाखेरिस 'या' ५ राशींना मिळणार धन, संपत्ती करिअरबाबत मोठी भेट
18
सफला एकादशी २०२५: सफला एकादशीचा गुप्त उपाय! कागदावर ३ इच्छा लिहा, २०२६ ला इच्छापूर्तीचा अनुभव घ्या!
19
Crime: "मला प्रेग्नंट कर नाही तर,..." हे ऐकताच प्रियकर भडकला; विवाहित प्रेयसीला कायमचं संपवलं
20
Food: भेसळयुक्त पनीर कसे ओळखाल? फक्त ४ मिनिटात घरी 'या' ४ सोप्या चाचण्या करून पाहा!
Daily Top 2Weekly Top 5

टाळ-मृदंगाचा निनाद अन् ज्ञानेश्वर महाराजांचा अखंड जयघोष; अलंकापुरीत लाखो वैष्णवांचा मेळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2022 16:47 IST

रविवारी पहाटेपासूनच नगरप्रदक्षिणा मार्ग दिंड्या आणि पालख्यांमधील भाविकांच्या गर्दीने ओसंडून वाहत होता

आळंदी : यात्रे अलंकापुरा येती ! ते आवडी विठ्ठला !!             पांडुरंगे प्रसन्नपणे ! दिधले देणे हे ज्ञाना !!             भूवैकंठ पंढरपूर ! त्याहुनी थोर महिमा या !!              निळा म्हणे जाणोनि संता ! धावत येती प्रतिवर्षी !!            या अभंगाप्रमाणे इंद्रायणीतीरी टाळ - मृदुंगाचा निनाद, ‘ज्ञानेश्वर महाराजांचा अखंड जयघोष’, आणि भगवा झेंडा उंचावत फेर - फुगड्यामध्ये देहभान विसरून नाचणाऱ्या वारकऱ्यांमुळे कार्तिकी एकादशीच्या (दि.२०) दिवशी संपूर्ण अलंकापुरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. माऊलींच्या पालखी नगर प्रदक्षिणेवेळी भाविकांच्या गर्दीने उच्चांक गाठला. तत्पूर्वी रविवारी पहाटेपासूनच नगरप्रदक्षिणा मार्ग दिंड्या आणि पालख्यांमधील भाविकांच्या गर्दीने ओसंडून वाहत होता.

 श्री. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ७२६ व्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी राज्यासह इतर राज्यातून लाखो भाविकांचा महामेळा अलंकापुरीत जमला आहे. कार्तिकी एकादशी निमित्त पवित्र इंद्रायणीत स्नान करून लाखो भाविकांनी ज्ञानदेवांच्या संजीवन समाधीचे डोळेभरून दर्शन घेतले. इंद्रायणी घाट, हैबतबाबा पायरी, पुंडलिक मंदिर, नृसिह सरस्वती महाराज मंदिर, संत जलाराम मंदिर, राघवदास महाराज, ज्ञानेश्वर भिंत, साईबाबा मंदिर, गजानन महाराज मंदिर, पद्मावती मंदिर, गोपाळपुरा, विश्रांतवड आदी ठिकाणी भाविकांची दर्शनासाठी गर्दी केली आहे.

 दरम्यान दुपारी साडेबाराच्या महानैवद्यानंतर माऊलींच्या चांदीच्या मुखवट्याची सजावट व पोशाख परिधान करण्यात आला. दुपारी दीडच्या सुमारास माऊलींची पालखी नगरप्रदक्षिणेसाठी महाद्वारातून बाहेर पडली. यावेळी पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. शनीमंदिरापासून फुलवाले धर्मशाळा, चाकण चौक, भैराबा चौकमार्गे निघालेला हा सोहळा हजेरी मारुतीजवळ येऊन काही वेळापुरता विसावला. या ठिकाणी सर्व दिंड्यावाल्यांची हजेरी घेऊन प्रत्येकी एक - एक अभंग सादर करून सोहळा पुढे मार्गस्थ झाला. 

टॅग्स :Alandiआळंदीsant dnyaneshwarसंत ज्ञानेश्वरSocialसामाजिकTempleमंदिरsant tukaramसंत तुकाराम