शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

आळंदी: माऊलींचा आषाढी पालखी सोहळा स्वगृही परतला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 20:03 IST

‘श्रीं’च्या भेटीने भाविकांचे डोळे पाणावले...

- भानुदास पऱ्हाड

आळंदी : हलक्या पावसाच्या सरी... टाळ - मृदुंगाचा निनाद... 'माऊली - तुकारामांचा अखंड जयघोष... विविध वाद्यांचा गजर... रांगोळीच्या पायघड्या व फटाक्यांची आतषबाजी अशा चैतन्यपूर्ण वातावरणात संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर माउलींचा आषाढी पायीवारी पालखी सोहळा शनिवारी (दि.२३) सायंकाळी हजारो वैष्णवांच्या साक्षीने अलंकापुरीत विसावला. तब्बल ३२ दिवसांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर ‘श्रीं’ची भेट झाल्यामुळे आळंदीकरांचे तसेच भाविकांचे डोळे पाणावले होते.

माउलींची पालखी आळंदीच्या वेशीवर येण्यापूर्वी प्रथेपरंपरेनुसार चोपदारांकडून “सर्व सुख गोडी साही शास्रे निवडी” या हरिपाठारावरील शेवटच्या अभंगावर सुरु असलेल्या चक्रांकित महाराजांच्या कीर्तनात माऊलींची पालखी दाखल झाल्याची वर्दी देण्यात आली. चक्रांकित महाराजांच्या दिंडीने पालखीला सामोरे जाऊन पालखीचे स्वागत करून माऊलींची आरती घेण्यात आली. त्यानंतर नगरपालिका चौक, श्रीविष्णू मंदिर, श्रीराम मंदिर, हरीहरेद्रस्वामी मठमार्गे पालखीने महाद्वारातून मंदिरात प्रवेश केला. मंदिर प्रदक्षिणा केल्यानंतर विणामंडपात पालखी स्थिरावली.

पालखीतील ‘श्रीं’च्या पादुका गाभाऱ्यात समाधीसमोर विराजमान करून संस्थांनतर्फे  माऊलींची आरती घेण्यात आली. आरतीनंतर श्री नरसिंग सरस्वती स्वामी महाराज मुळपीठ देवस्थानतर्फे श्रींना पिठलं भाकरीचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला. तद्नंतर हैबतबाबांच्या ओवरीकडे आरती घेण्यात आली. परंपरेनुसार चक्रांकित महाराजांच्या वतीने पिठलं - भाकरीचा प्रसाद वाटून अशा मंगलमय दिनाची सांगता करण्यात आली. दरम्यान माउलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी झाली होती.

तत्पूर्वी, माउलींना आळंदीत घेऊन येण्यासाठी स्थानिक नागरिक, ज्ञानेश्वर विद्यालयाचे विद्यार्थी तसेच भाविकांनी थोरल्या व धाकट्या पादुका मंदिरस्थळी मोठी गर्दी केली होती. थोरल्या पादुका मंदिरात पहिला व धाकट्या पादुका स्थळावर दुसरा विसावा घेण्यात आला. धाकट्या पादुका विसाव्यावर पालखीवर फुलांचा वर्षाव करण्यात आला. शहरात विविध वाद्यांच्या स्वरात माउलींच्या पालखीचे जंगी स्वागत करण्यात आले. रविवारी (दि. २४) दुपारी साडेबाराला ‘श्रीं’ची पालखीतून नगरप्रदिक्षणा मिरवणूक होईल. हजेरी मारुती मंदिरात पालखी सोबतच्या दिंड्यांचे हजेरीचे अभंग घेतले जाणार आहेत.            

आळंदीत माऊलींचा सोहळा आगमनापूर्वी थोरल्या पादुका मंदिर येथे 'श्रीं'चे वैभवी सोहळ्याचे परंपरेचे पालन करत ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष अॅड. विष्णु तापकीर यांचे हस्ते पादुका पूजा व माऊलीची आरती करण्यात आली. यावेळी पालखी सोहळ्याचे मालक राजेंद्र आरफळकर, पालखी सोहळा प्रमुख अॅड. विकास ढगे पाटील, मानकरी, विणेकरी सेवक, चोपदार यांचा सत्कार अध्यक्ष ॲड विष्णू तापकीर यांचे हस्ते करण्यात आला. 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखी