शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

ड्रग्स माफिया ललित पाटीलला मदत केल्याप्रकरणी संस्था चालक विनय अ-हाना पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2023 18:47 IST

विनय अ-हानाच्या कारचालकाने ललित पाटीलला ससून रुग्णालयातून पळाल्यानंतर कारमधून पुणे शहराच्या बाहेर सोडले होते

किरण शिंदे

पुणे : संपूर्ण राज्यात सध्या चर्चा सुरू असलेल्या ससून रुग्णालयात पकडलेल्या ड्रग्ज प्रकरणातील आरोपी ललित पाटील याला मदत केल्याप्रकरणी प्रसिद्ध संस्थाचालक विनय अ-हानाला पुणेपोलिसांनी ताब्यात घेतले. विनय अ-हाना याला ईडीने यापूर्वीच अटक केली होती. आता ललित पाटील फरार प्रकरणात त्याला ताब्यात घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ललित पाटील ससून रुग्णालयातून फरार झाल्याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात भादवी कलम 224, 225 नुसार गुन्हा दाखल आहे. 

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने काही दिवसांपूर्वी ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळून 2 कोटी 14 लाखांचे ड्रग्ज पकडले होते. तर दोघांना अटक केली होती. पोलिसांच्या तपासात ललित पाटील या गुन्ह्याचा सुत्रधार असल्याचे समोर आले होते. मात्र त्याला अटक करण्यापूर्वीच तो ससून रुग्णालयातून पसार झाला होता.त्यानंतर मात्र हे संपूर्ण प्रकरण राज्यात गाजले. ललित पाटील पळाला की त्याला पळवून लावले असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यासोबतच या ललितला कोणी-कोणी मदत केली याचा तपासही पोलीस करत होते. 

तपासादरम्यान पुणे पोलिसांनी सुरवातीला अ-हानाचा चालक दत्ता डोके याला अटक केली होती. त्यानेच ललित पाटीलला ससून रुग्णालयातून पळाल्यानंतर कारमधून पुणे शहराच्या बाहेर सोडले होते. तसेच त्याच्याकडून 10 हजार रुपये देखील घेतले होते. मात्र तपासादरम्यान आणखी रंजक माहिती समोर आली. रुग्णालयात असताना ललित पाटील बाहेर फिरत होता. त्याला भेटण्यासाठीही अनेकजण येत होते. त्याचे काही सीसीटीव्ही देखील समोर आले होते. 

दरम्यान विनय अ-हाना याचा चालक डोके याच्याकडे पुणे पोलिसांनी तपास केला असता विनय याचा देखील या गुन्ह्यात सहभाग असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. तेव्हा पोलिसांनी आज विनय याला तळोजा कारागृहातून त्याचा ललित पाटील याच्या ससून रुग्णालयातून पळ काढल्याप्रकरणी ताबा घेतला आहे. त्याला पुणे पोलीस तळोजा कारागृहातून घेऊन पुण्यात रात्री उशिरा दाखल होतील. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीDrugsअमली पदार्थbusinessव्यवसाय