संक्रांतीची चाहूल : हिरवा चुडा, बांगड्या भरण्यासाठी लगबग
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2019 00:18 IST2019-01-12T00:18:10+5:302019-01-12T00:18:32+5:30
संक्रांतीची चाहूल : नव्या वाणाचे कुतूहल

संक्रांतीची चाहूल : हिरवा चुडा, बांगड्या भरण्यासाठी लगबग
काºहाटी : काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात महिलांची हिरवा चुडा व बांगड्या भरण्यासाठी गर्दी होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
बारामतीच्या जिरायती भागात मकर संक्रांत महिलांमध्ये महत्त्वाचा सण म्हणून ओळखला जातो. या सणाला अनेक महिला एकत्र येऊन एकमेकींना हळदी-कुंकवाचा मान देतात. तसेच, तिळगूळ देऊन मोठ्या उत्साहात सण साजरी करतात. मकर संक्रांतीच्या सणाला नवीन लग्न होऊन गेलेल्या मुलीची माहेरी आल्यानंतर खोबऱ्याच्या वाटीबरोबर तांदळाने ओटी भरली जाते. काºहाटीमध्ये सर्व महिला एकत्र येऊन गावातील यशवंतराव, जानूबाई, कालिकामाता मंदिर, लक्ष्मीदेवी मंदिर तसेच विठ्ठल-रखुमाई आदी मंदिरांत महिला देवांची पूजा करतात. एकत्र येऊन एकमेकींना वाण देतात. हळदी-कुंकूवाचे वाण घेतात. या सोहळ्याला महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहून मकर संक्रांतीचा सण साजरा करतात.