संकेत भोंडवे यांना 'राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:11 IST2021-02-14T04:11:37+5:302021-02-14T04:11:37+5:30
भारत सरकारच्या केंद्रीय सडक परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचे खाजगी सचिवपदावर संकेत भोंडवे कार्यरत आहेत. मध्य प्रदेशात चार ...

संकेत भोंडवे यांना 'राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार
भारत सरकारच्या केंद्रीय सडक परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचे खाजगी सचिवपदावर संकेत भोंडवे कार्यरत आहेत. मध्य प्रदेशात चार ठिकाणी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशा अनेक विभागांत त्यांनी अनेक पदांवर यशस्वी कार्य केल्याने कर्तबगार आयएएस अधिकारी म्हणून त्यांना भारत सरकारकडून ६ राष्ट्रीय पुरस्कार मिळाले, तर मध्य प्रदेश सरकारचे ९ राज्य पुरस्कार मिळाले आहेत. राज्याचे अर्थमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, खासदार डॉ. अमोल कोल्हे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख व आमदार अतुल बेनके अशा ५ जणांच्या कमिटीने भोंडवे यांना पुरस्कार जाहीर केला.