शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात गरीब रुग्णांच्या हक्कासाठी ’संजीवनी’ ठरतेय आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2018 14:46 IST

धर्मादाय रुग्णालयांमध्ये गरिबांना उपचार मिळावेत, यासाठी काही बेड रिकामे ठेवणे बंधनकारक आहे. परंतु, त्या बेडची सेवा गरिबांना देताना मोठी रुग्णालये आडकाठी आणत आहेत.

ठळक मुद्देराज्यभर ३० जणांची टीम; हजारो रुग्णांना दिलासा या समितीकडे पुणे शहरातूनच दररोज दहा ते १२ रुग्णांच्या तक्रारी आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी नावाचा उपक्रम हातीसंजीवनी उपक्रम राबविण्यासाठी बाऊन्सर ठेवणे सुरू

पुणे : गरीब रुग्णांना मोठ्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी अगोदर पैसे भरा; मगच उपचार सुरू होतील, एखादा रुग्ण मृत पावला, तर पैसे भरल्याशिवाय मृतदेहही दिला जात नाही, अशा अनेक तक्रारींवर प्रहार संघटनेची आरोग्य सेवा समिती राज्यभर काम करत आहे. त्यामुळे रुग्णांना संजीवनी मिळत असून, गरिबांसाठी तो एक आधार बनत आहे. या समितीकडे पुणे शहरातूनच दररोज दहा ते १२ रुग्णांच्या तक्रारी येत आहेत. धर्मादाय रुग्णालयांमध्ये गरिबांना उपचार मिळावेत, यासाठी काही बेड रिकामे ठेवणे बंधनकारक आहे. परंतु, त्या बेडची सेवा गरिबांना देताना मोठी रुग्णालये आडकाठी आणत आहेत. परिणामी, अनेक गरिबांना आपला जीव गमवावा लागत आहे. परंतु, या गरीब रुग्णांना आधार देण्यासाठी आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी नावाचा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे. हा उपक्रम राबविण्यासाठी राज्यात आरोग्य सेवा समिती स्थापन झालेली आहे. त्याद्वारे सुमारे ३० जण रुग्णांच्या हक्कासाठी लढत आहेत. या उपक्रमाबाबत पुण्यातील नयन पुजारी यांनी लोकमतला माहिती दिली. ते म्हणाले, सध्या गरिबांना मोठी रुग्णालये जुमानत नाहीत. खरंतर गरीब रुग्णांना त्यांचा उपचाराचा हक्क सरकारने दिलेला आहे. फुकटात उपचार देत असले, तरी सरकारकडून रुग्णालयांना त्याबदल्यात अनुदान मिळते. मग तरी अधिक पैसे कमविण्यासाठी मोठी रुग्णालये गरिबांना लुटत आहेत. शासकीय योजना आता बंद आहेत, तुम्हाला पैसे भरावेच लागतील, अशी दमदाटी अनेक रुग्णालये करीत आहेत. त्यामुळे रुग्ण आमच्याकडे येतात. तेव्हा आम्ही त्यांना संबंधित रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत करतो.ह्णह्ण गरीब रुग्णांकडे पिवळे रेशनकार्ड असेल किंवा उत्पन्नाचा दाखला असेल, तर त्यांना मोठ्या रुग्णालयात त्वरित उपचार देणे आवश्यक आहे. धर्मादाय आयुक्तांकडून दिलेल्या पत्रांनाही ही रूग्णालये केराची टोपली दाखवतात. त्यामुळे बिचारे गरीब रूग्ण उपचारांविनाच आपला प्राण गमवतात. असे होऊ नये यासाठी आम्ही अनेक रूग्ण हक्क सेवक म्हणून काम करत आहोत. पुण्यात उमेश महाडिक, नौशाद शेख आणि अजून एक दोघांची टीम आहे. तर इतर जिल्ह्यात मिळून सुमारे ३० जण राज्यभर काम करतो, असे नयन पुजारी यांनी सांगितले.  संजीवनी राबविण्यासाठी बाऊन्सरची मदत  संजीवनी उपक्रम राबविण्यासाठी आम्ही देखील बाऊन्सर ठेवणे सुरू केले आहे. त्यात महिलांचाही समावेश आहे. कारण कधी-कधी रूग्णालय प्रशासन दमदाटी करते. तेव्हा आम्हाला या बाऊन्सरचा उपयोग होतो. आमच्या टीममधील सर्वजण आपआपले व्यवसाय सांभाळून हे काम करत आहेत, असे पुजारी म्हणाले.  ...................बिल कमी करून देणारे एजंटही वाढले सध्या अनेक रूग्णालयाबाहेर आणि धर्मादाय आयुक्तालयाच्या बाहेर रूग्णांचे बिल कमी करून देतो, असे म्हणणारे एजंटही मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. त्यामुळे अनेक रूग्ण फसवले जात आहेत, यावरही चाप बसणे आवश्यक असल्याचे पुजारी यांनी सांगितले.   

टॅग्स :Puneपुणेhospitalहॉस्पिटलBachhu Kaduबच्चू कडू