भीमगीतांवर खासदार संजय काकडे यांनी धरला ठेका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 19:56 IST2018-04-25T19:56:25+5:302018-04-25T19:56:25+5:30
भिम फेस्टिवलचे उदघाटन खासदार संजय काकडे व आमदार जगदीश मुळीक यांच्या हस्ते करण्यात आले.

भीमगीतांवर खासदार संजय काकडे यांनी धरला ठेका
विमाननगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची येथे मिरवणुकीत प्रतिमा आकर्षक रथात ठेवण्यात आली होती. त्यामागे बँड पथक, ढोल-लेझीम पथक मिरवणुकीत सहभागी करण्यात आले होते. या वेळी खासदार संजय काकडे यांनी भीमगीतांवर भीमगीतांवर ठेका धरून नृत्य केले.
तक्षशिला प्रतिष्ठानच्या वतीने विमाननगर येथे आयोजित भिम फेस्टिव्हल २०१८ मध्ये मान्यवरांनी सहभाग घेतला.भिम फेस्टिवलचे उदघाटन खासदार संजय काकडे व आमदार जगदीश मुळीक यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष सुशील मेंगडे, नगरसेवक संदीप जऱ्हाड , भैय्यासाहेब जाधव, नगरसेविका किरण जठार, आरपीआयचे महेंद्र कांबळे, भाजपचे महेंद्र गलांडे, शिवसेनेचे नितीन भुजबळ यांच्यासह भीम फेस्टिव्हलचे मुख्य संयोजक नगरसेवक व क्रीडा समिती अध्यक्ष राहुल भंडारे उपस्थित होते.
खासदार काकडे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर काम करत असताना समाजातील सर्व घटकांच्या उन्नतीसाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल. त्याचप्रमाणे नागरिकांनी आंबेडकरांच्या विचारांना अनुसरुन मार्गक्रमण केले पाहिजे.