शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या पॉलिसीमुळेच चहावाला देशाचा पंतप्रधान : संजय जगताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 19:49 IST

गेल्या ६० वर्षात काँग्रेसने केलेल्या विकासकामामुळे एक चहवाला देशाच्या पंतप्रधान झाला आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी केले.

ठळक मुद्देइंदिरा गांधी जन्मशताब्दी पंधरवड्यानिमित्त १ ते १७ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत काँग्रेसच्या वतीने विविध उपक्रमजिल्ह्यातील तेरा तालुक्यात महाविद्यालयीन पातळीवर खुल्या गटात होणार वक्तृत्व स्पर्धा

पुणे : काँग्रेस हा पक्ष नाही, तर पॉलिसी आहे. देशातील सर्वसामान्य माणसाचा विकास काँग्रेसने केला आहे आणि यापुढेही करत राहील. गेल्या तीन वर्षात सत्ताधारी पक्षाला कोणतीही ठोस कामे करता आली नाही. त्यामुळे नुसत्या घोषणाबाजीत ते मश्गूल आहेत. गेल्या ६० वर्षात काँग्रेसने केलेल्या विकासकामामुळे एक चहवाला देशाच्या पंतप्रधान झाला आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी केले.माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पंधरवडा कार्यक्रमाच्या नियोजनानिमित्त काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी माजी खासदार विदुरा नवले, उपाध्यक्ष संग्राम मोहोळ, खजिनदार महेशबापू ढमढेरे, नंदुकाका जगताप, पृथ्वीराज पाटील, स्वप्निल सावंत, सोमनाथ दौंडकर, सत्यशील शेरकर, कौस्तुभ गुजर, सीमा सावंत आणि विजय जाधव उपस्थित होते. पुणे जिल्ह्यात इंदिरा गांधी जन्मशताब्दी पंधरवड्यानिमित्त १ ते १७ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. इंदिरा गांधी यांच्या जिवनावर आधारित नव्या पिढीला माहिती होण्याच्या दृष्टीने वक्तृत्व स्पर्धा,  जीवनपट सांगणारी भाषणे, इंदिरा गांधी यांची कार्यकीर्द, धोरण या विषयाबाबत जागृती करण्याच्या दृष्टीने ‘इंदिरा’ रथ जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील गावागावात जाऊन जनजागृती करणार आहे.तसेच जिल्ह्यातील तेरा तालुक्यात महाविद्यालयीन पातळीवर खुल्या गटात वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये विजयी उमेदवारांना प्रथम तीन क्रमांकानुसार ५ हजार, ३ हजार आणि २ हजार रूपयांचे तसेच उत्तेजनार्थ प्रत्येकी पाच जणांना १ हजार रूपयांचे पारितोषीक, सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी किमान ३० स्पर्धक असावेत अशी अट असणार आहे. प्रत्येक तालुक्यातील ५ स्पर्धक असे तेरा तालुक्यातील एकूण ६५ स्पर्धकांची वरील विषयावर जिल्हा पातळीवर पुणे येथे स्पर्धा होणार आहे. त्यातील १० विजयी स्पर्धकांना अनुक्रमे १० हजार, ७ हजार आणि ५ हजार तसेच ७ जणांना उत्तेजनार्थ प्रत्येकी ३ हजार रूपयांचे रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्हा देण्यात येणार आहे. ही स्पर्धा सर्वांना खुली असणार आहे. पंधरवडा कार्यक्रमाचा समारोप पुणे येथील गणेश कला क्रीडा मंच येथे काँग्रेसच प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार आहे. संजय जगताप म्हणाले, की काँग्रेसने नेहमी सर्वसामान्य माणसाला त्याच्यातले गुण हेरून देशाचे नेतृत्व करण्याची संधी दिली आहे. त्यामुळेच इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंहराव, डॉ. मनमोहन सिंग अशा दमदार नेतृत्वामुळे आज देश प्रगतीच्या वाटेवर आहे. काँग्रेस पक्षाने राबविलेल्या विविध पॉलिसीमुळे आजची आपली वाटचाल सुकर झाली आहे. 

टॅग्स :Indian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसPuneपुणेBJPभाजपा