निमसाखरला रात्री वाळू माफियांचा हैदोस

By Admin | Updated: August 20, 2015 02:34 IST2015-08-20T02:34:10+5:302015-08-20T02:34:10+5:30

येथील नीरा नदीपात्रातून रात्रीच्या वेळी जेसीबी यंत्राच्या साहायाने वाळू उपसली जात आहे. नदीचे पात्र कोरडे असल्याने येथून बागडे (ता. माळशिरस) येथील किमान

Sand Mafia's Haidos at night on Monday night | निमसाखरला रात्री वाळू माफियांचा हैदोस

निमसाखरला रात्री वाळू माफियांचा हैदोस

निमसाखर : येथील नीरा नदीपात्रातून रात्रीच्या वेळी जेसीबी यंत्राच्या साहायाने वाळू उपसली जात आहे. नदीचे पात्र कोरडे असल्याने येथून बागडे (ता. माळशिरस) येथील किमान शंभर विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी निमसाखरमध्ये येत असतात. तर ग्रामस्थ कामासाठी मजुरीसाठी येत असतात. वाळू उपसाच्या चाळाच्या ढिगामुळे व पात्रातील खड्ड्यांमुळे अपघात होण्याची भीती आहे. त्वरीत या वाळू चोरांवर कारवाई करावी अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.
सध्या पावसाने ओढ दिली आहे. निरा नदीच्या पात्रात पाणी संपलेले आहे. नदीचे पात्र कोरडे पडलेले आहे. शेतकऱ्यांना शेतातील उभे पिके पूर्णपणे जळण्याच्या मार्गावर आहेत. त्याचा फायदा सध्या निमसाखर येथे वाळू माफियाने घेतलेला आहे. निमसाखर गावा लगतच्या निरा नदीच्या पात्रातून रात्रीच्या वेळेत जेसीबी यंत्राच्या सहाय्याने वाळू उपसा सुरू आहे.
या वाळू उपसामुळे नदीच्या पात्रील वाळूत जे पाणी आहे, ते ही मोठ्या प््रााणात कमी होत आहे. माळशिरस तालुक्यातील बागडे येथील विद्यार्थी निमसाखर येथे शिक्षण घेण्यासाठी येत आहेत. तसेच दळवळासाठी येथील ग्रामस्थ दररोज येत आहेत. वाळू माफियांनी पात्रामध्ये मोठ-मोठे ढिग केले आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. येथील निरानदीच्या पात्रा वरती कोल्हापुर पध्दतीचा बंधारा नसल्याने पाणी आल्या वरती येथील ग्रामस्थ, विद्यार्थी होडीने ये-जा करीत आसतात. पाणी आल्यावर होडीचालाकांनाही धोका आहे. सध्या पाऊस नसल्याने हे चाळाचे ढिग सपाट करता येऊ शकतात, त्यामुळे हे चाळाचे ढिग सपाट करण्यात यावेत व वाळू उपसा बंद करण्यात यावेत अशी मागणी पालक व ग्रामस्थ करीत आहेत.

Web Title: Sand Mafia's Haidos at night on Monday night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.