शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
4
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
5
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
6
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
7
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
8
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
9
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
10
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
11
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
12
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
13
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
14
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
15
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
16
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
17
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
18
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
19
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
20
अजितदादांना शह देण्यासाठी पार्थ पवार प्रकरण काढलं गेलं का?; चंद्रकांत पाटील म्हणाले...

समृद्ध जीवनच्या महेश मोतेवार यांच्या मुलासह दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 20:14 IST

गुंतवणुकदारांना आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टी पर्पज सोसायटीचे महेश मोतेवार यांच्या मुलासह दोघांना राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने गुरुवारी अटक केली़.

ठळक मुद्देराज्य गुन्हे अन्वेषणची कारवाई : मालमत्तांची केली खरेदीसमृद्धी जीवनच्या संचालकांसह एकूण २० जणांवर २९ सप्टेंबर २०१६ मध्ये गुन्हा दाखल

पुणे : गुंतवणुकदारांना आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टी पर्पज सोसायटीचे महेश मोतेवार यांच्या मुलासह दोघांना राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने गुरुवारी अटक केली़. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश जे़ टी़ उत्पात यांनी त्यांना अधिक तपासासाठी १८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे़.अभिषेक महेश मोतेवार (वय २१, रा़ गणराज हाईट्स, बालाजीनगर, धनकवडी) आणि संचालक प्रसाद किशोर पारसवार (वय३२, रा़ कृष्णामाई सोसायटी, तळजाई पठार, धनकवडी) अशी त्यांची नावे आहेत़.समृद्ध जीवनचे संचालक महेश मोतेवार यांनी गुंतवणुकीच्या आमिषाने देशभरातून मोठ्या प्रमाणावर पैसे गोळा केले होते. भांडवल बाजार नियामक सेबीनेही त्यांच्यावर बाजारातून पैसे गोळा करण्यावर निर्बंध घातले होते. त्यानंतरही कंपनीने ठेवी स्वीकारल्या. फसवणुकप्रकरणी सेबीच्या तक्रारीवरून मोतेवारसह इतरांविरुद्ध विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. महाराष्ट्र आणि ओडिशातील चिटफंड गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयने समृद्ध जीवनच्या सर्व कंपन्या आणि कार्यालयांवर कारवाईचा फास आवळला आहे़. याप्रकरणी किरण दीक्षित यांनी फिर्याद दिली असून समृद्धी जीवनच्या संचालकांसह एकूण २० जणांवर २९ सप्टेंबर २०१६ मध्ये गुन्हा दाखल झाला आहे़. राज्यभरात दाखल झालेल्या सर्व गुन्ह्यांचा तपास सीआयडीने देण्यात आला आहे़. याप्रकरणात सीआयडीने याअगोदर महेंद्र गाडे, सुनिता किरण थोरात यांना अटक केली आहे़. त्यांना न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे़.काही दिवसांपूर्वीच अभिषेक मोतेवार यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला होता़. सीआयडीच्या पोलीस अधीक्षक ज्योती क्षीरसागर यांनी गुरुवारी दोघांना अटक करुन विशेष न्यायालयात हजर केले़. सहायक सरकारी वकील सुनिल हांडे यांनी न्यायालयात सांगितले की, अभिषेक मोतेवार यांनी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज सोसायटी व समृद्ध जीवन फुडस इंडिया या कंपन्यांमध्ये गुंतवणुकदारांकडून जमा केलेल्या पैशांची विल्हेवाट आपली आई वैशाली मोतेवार यांच्या नावे विविध मालमत्ता घेऊन लावली आहे़. प्रसाद पारसवार हे समृद्ध जीवन समूहाच्या ८ विविध कंपन्यांमध्ये संचालक म्हणून कार्यरत आहेत़. या दोघांनी सोसायटीच्या पैशांमधून खरेदी केलेल्या मालमत्ता परस्पर कोणास विकल्या आहेत किंवा सोसायटीच्या नावे किती ठिकाणी मालमत्ता खरेदी केलेल्या आहेत, याचा तपास करायचा आहे़. अभिषेक यांनी महेश मोतेवार व वैशाली मोतेवार यांच्या खात्यांवरुन रक्कमा वळत्या केलेल्या आहेत़. प्रसाद पारसवार यांनी सोसायटीतून घेतलेली अग्रीम रक्कमेपैकी ६ लाख २७ हजार ४९७ रुपये परत केलेले नाहीत़. दोघांनी संगनमत करुन फसवणूक केलेल्या रक्कमांतून कोणकोणत्या मालमत्ता विकत घेण्यासाठी खर्च केलेल्या आहेत, याचा अधिक तपास करायचा असल्याने पोलीस कोठडीची मागणी केली़. न्यायालयाने ती ग्राह्य धरुन त्यांना १८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली़.  

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हाPoliceपोलिसCourtन्यायालय