शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पुणे विमानतळावर दुबईहून आलेल्या प्रवाशांकडून जिवंत ४६६ प्रवाळ जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 20:14 IST

पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुबईहून आलेल्या आणि ग्रीन चॅनलमधून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन प्रवाशांना सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी अडवून त्यांच्या बॅगेची तपासणी ...

पुणे :पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुबईहून आलेल्या आणि ग्रीन चॅनलमधून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन प्रवाशांना सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी अडवून त्यांच्या बॅगेची तपासणी केली. तेव्हा बॅगेत ४६६ जिवंत प्रवाळ आढळून आले. सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे नमुने जप्त केले आहे. त्यांच्या पूनर्वसनासाठी मुंबईतील तारापोरवाला मत्स्यालयाकडे सोपविण्यात आले आहेत.

याबाबत सीमा शुल्क अधिकार्यांनी सांगितले की, दुबईहून जेट एअरवेजच्या विमानाने नवी मुंबई (वय ३२) आणि मुंबई (वय २८) येथील दोन तरुण ५ एप्रिल रोजी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले. त्यांनी ग्रीन चॅनलमधून जाण्याचा प्रयत्न केला. अधिकाऱ्यांनी संशय आल्याने त्यांनी त्यांच्याकडील बॅगांची कसून तपासणी केली. त्यात एका बॅगेमध्ये प्लॅस्टिकच्या बरण्यांमध्ये १०० जिवंत प्रवाळ आढळून आले. दुसऱ्या बॅगेत प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये ३६६ जिवंत प्रवाळ आढळून आले. सीमा शुल्क विभागाने ते जप्त केले आहेत.

त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी व्यावसायिक कारणासाठी ते आणल्याचे मान्य केले. दोघांकडे चौकशी करण्यात येत असून त्याची बाजारपेठेतील किंमतीची माहिती घेत असल्याचे सीमा शुल्क विभागाचे उपायुक्त धनंजय कदम यांनी सांगितले.

शोभेसाठी होतो उपयोगजिवंत प्रवाळांचा उपयोग अनेक श्रीमंतांच्या घरात ॲक्वेरियममध्ये शोभेसाठी केला जातो. या प्रवाळांची किंमत साधारण बाराशे रुपयांपासून १८ हजार रुपयांपर्यंत असते. हे प्रवाह जेवढे आकर्षक तेवढी अधिक त्याची किंमत असते. काही प्रवाळांचा वैद्यकीय कारणांसाठी वापर केला जातो. जिवंत प्रवाळाचा तस्करीचा प्रकार प्रथमच उघडकीस आला आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी