पुण्यातही बुली बाईसारखा प्रकार? शहरातील मुलींचे चेहरे नग्न महिलांच्या चेहऱ्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2022 10:00 IST2022-01-12T09:57:07+5:302022-01-12T10:00:15+5:30
पुणे : वस्तीमध्ये राहणाऱ्या महिला व मुलींचे फोटो काढत ते अश्लील स्वरूपात तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी खडकी ...

पुण्यातही बुली बाईसारखा प्रकार? शहरातील मुलींचे चेहरे नग्न महिलांच्या चेहऱ्यावर
पुणे : वस्तीमध्ये राहणाऱ्या महिला व मुलींचे फोटो काढत ते अश्लील स्वरूपात तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी खडकी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. न्यायालयाने त्याला १५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. या प्रकरणी खडकी पोलिसांनी २५ वर्षीय तरुणाला अटक केली. याबाबत त्याच्या वस्तीमध्ये राहणाऱ्या व्यक्तीने फिर्याद दिली आहे. ९ जानेवारी रोजी खडकी (khadki, pune) परिसरात ही घटना घडली.
आरोपीने तो राहत असलेल्या महिला आणि अल्पवयीन मुलींचे फोटो, व्हिडिओ स्वतःच्या मोबाईलमध्ये काढले. त्यानंतर त्या फोटो आणि व्हिडिओचे अश्लील स्वरूपात रूपांतर करून ते व्हायरल केले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी तरुणाला न्यायालयात हजर केले असता, हा २०१९ पासून तो अशाप्रकारे प्रकारे फोटो आणि व्हिडिओ तयार करत आहे.
आरोपीने जप्त मोबाईल हँडसेटसह इतर मोबाईलचादेखील वापर केला आहे. त्या इतर हँडसेटबाबत त्याच्याकडे तपास करायचा आहे, तसेच त्याने वस्तीमधील महिला आणि मुलींचे मोबाईलमध्ये अश्लील फोटो आणि व्हिडिओ तयार केले आहेत. त्यातील १८ वर्षांखालील ४ मुली आणि ३ महिलांची नावे निपन्न झाली आहेत. उर्वरित मुली, महिलांबाबत तपास करायचा आहे.
आरोपीच्या व्हाॅट्सअपच्या यादीमध्ये ब्राझील, पाकिस्तान यासह अन्य देशातील ग्रुप असून त्यावर अनेक अश्लील फोटो, व्हिडिओ व्हायरल केले आहेत. त्याबाबत त्याच्याकडे तपास करण्यासाठी, त्याचा आणखी कोणी साथीदार आहे का, याचा तपास करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील शुभांगी देशमुख यांनी केली.