शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

समता भूमी स्मारक खासगी संस्थेला देण्याचा घाट; सरकारकडे पैसे नाहीत का? पुरोगामी संघटनांचा खडा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 17:22 IST

राज्य पुरातत्त्व विभागाच्या नियंत्रणाखाली स्मारकाची निगराणी सुरू आहे. असे असताना राजकीय दबावामुळे खासगी संघटनेकडे स्मारक सोपवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप पुरोगामी संघटनांनी केला आहे.

पुणे : महात्मा फुले यांच्या राहत्या वाड्याचे समताभूमी अशा नावाने राष्ट्रीय स्मारक झाले. आता हे स्मारक संचलनासाठी म्हणून खासगी संस्थेला देण्याचा घाट सरकारकडून घातला जात आहे. त्याला पुरोगामी संघटनेने विरोध केला आहे. याबाबतचे निवेदन पुरातत्त्व विभागाला देण्यात आले.

सध्या हे स्मारक राज्य पुरातत्त्व विभागाच्या नियंत्रणाखाली आहे. ते काढून समता परिषदेचे अध्यक्ष असलेले अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या समता परिषदेला देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. महात्मा फुले प्रतिष्ठानचे अध्यक्ष व ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या सततच्या संघर्ष व पाठपुराव्यामुळे सरकारला या वाड्याचे राष्ट्रीय स्मारक करणे भाग पडले. राज्य पुरातत्त्व विभागाच्या नियंत्रणाखाली त्याची मागील अनेक वर्षे व्यवस्थित देखभाल-दुरुस्ती व निगराणी सुरू आहे. असे असताना राजकीय दबाव, राजकीय स्वार्थ यामुळे खासगी संघटनेकडे स्मारक सोपवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप पुरोगामी संघटना करत आहेत.

राष्ट्रीय एकात्मता समिती आणि म. फुले समता प्रतिष्ठानचे निमंत्रक नितीन पवार तसेच इब्राहिम खान, के. जे. जॉय, अंकुश शेडगे, प्रा. संजयकुमार कांबळे, विष्णू मोरे, विजय जगताप, शकुंतला घोरपडे, प्रकाश वाघमारे व सोपन घोगरे, सुधीर वाघमारे व अन्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी याला विरोध करणारे निवेदन पुरातत्त्व विभागाचे उपसंचालक विलास वाहणे तसेच महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना दिले. सरकारकडे स्मारकाच्या देखभाल दुरुस्तीसाठी पैसे नाहीत का? फक्त हेच स्मारक सरकारला जड झाले आहे का? असे प्रश्न या निवेदनात उपस्थित करण्यात आले आहे.

सरकारे याची दखल घेतली नाही तर काय करायचे याचा विचार करण्यासाठी प्रतिष्ठानच्या वतीने ४ डिसेंबरला सकाळी ११ वाजता हमाल पंचायत कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, मालधक्का येथे सर्व समविचारी संघटनांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती नितीन पवार यांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Samata Bhumi Memorial: Progressive groups oppose privatization, question government's motives.

Web Summary : Progressive organizations are protesting the government's plan to hand over the Samata Bhumi memorial, Mahatma Phule's residence, to a private organization. They question the government's financial constraints and allege political motivations behind the decision, threatening further action if ignored.
टॅग्स :PuneपुणेMahayutiमहायुतीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMahatma Phule Wadaमहात्मा फुले वाडाSavitri Bai Phuleसावित्रीबाई फुले