शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कडक सॅल्यूट!कुटुंब कोरोनाबाधित तरीदेखील 'खाकी वर्दी" रस्त्यावर बजावतेय 'कर्तव्य'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2021 14:34 IST

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात स्वतःचा जीव धोक्यात घालून आलेल्या परिस्थितीला सामोरे जात पोलिसांनी सामाजिक सुरक्षेचा विडा उचलला आहे.

बारामती ( सांगवी ) : पोलिसांची कामावर येण्याची वेळ ठरलेली असते, मात्र कर्तव्य बजावताना घरी जायची वेळ निश्चित नसते. तर कामाच्या व्यापामुळे जेवणाला ही कधीकधी वेळ नसतो.पण तरीही कुणाकडे तक्रार न करता ते आपली कामगिरी चोखपणे बजावत असतात. आजच्या घडीला कुटुंबात एखाद्या व्यक्तीला जरी कोरोना झाला तरी संपूर्ण कुटुंब काळजीपोटी अस्वस्थ होते. मात्र,गेली आठ दिवसांपासून कुटुंबातील पत्नी, दोन मुली कोरोनाबाधित होऊन देखील बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या अधिपत्याखालील माळेगाव दूरक्षेत्र येथे कर्तव्य बजावणारे पोलीस हवालदार जयंत ताकवणे हे रस्त्यावर उतरून आपले कर्तव्य बजावत आहेत.

जयंत ताकवणे यांच्या घरात त्यांची पत्नी, दोन मुली कोरोनाबाधित आहेत. मात्र, तरीही खचून न जाता सर्व प्रथम कुटुंबाची काळजी घेणे हे आदी कर्तव्य असताना देखील, जगावर ओढावलेल्या संकटसमयी प्रथम कर्तव्याला प्राधान्य दिले. त्यांच्या कर्तव्याबद्दल बोलायचे झाल्यास, पोलिसांचे ब्रीदवाक्य असलेले 'सद्ररक्षणाय खलनिग्रणहाय' त्यांच्या कामांमधून ते तंतोतंत पालन करून कर्तव्याला अधिक महत्व देऊन, माळेगाव हद्दीत येणाऱ्या गावांत गस्त घालून, रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी उभे आहेत.अधिक बाधित रुग्णांमुळे माळेगाव हे कोरोनाचे हॉटस्पॉट क्षेत्र आहे. तरीही अशा वेळेस कर्तव्यावर असल्याने पोलीस अधिकारी व समाजस्तरातून त्यांचे भरभरून कौतुक होत आहे. तर ताकवणे यांनी त्यांची पत्नी, व दोन मुली सध्या ठीकठाक असून घरीच उपचार घेत असल्याचे ' लोकमत' शी बोलताना सांगितले.

तर पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आदराने बोलून त्यांच्या अडचणी ऐकून घेऊन त्यांना योग्य सल्ला देण्याचे कामं ही जयंत ताकवणे यांनी केले आहे. त्यांच्या कामाबाबतही ते नावलौकिक आहेत. गेली कित्येक वर्ष ते लोकांसाठी अविरत सेवा बजावत आहेत.त्यामुळे त्यांनी आपल्या कामाची निष्ठा अधोरेखित केली आहे.

कोरोनाची एकीकडे साखळी तोडण्यासाठी शासनस्तरावर विशेष प्रयत्न केले जात आहेत. तर त्यासाठी दुसरीकडे कायदा सुव्यवस्था अबाधित राहून लोकांना घरातच बसण्यासाठी पोलिसांवर अधिकचा ताण आहे. त्यातही दिवसातून शेकडो लोकांशी पोलिसांचा संपर्क येतो. विविध प्रकारच्या तक्रारी ऐकून घ्यायच्या. अशा वेळी संसर्ग झालाच तर कुटुंबीयांचे काय होणार, असे एक ना अनेक प्रश्न त्यांना पडतात. तरीही कोरोनाची डोक्यावर टांगती तलवार घेऊन सर्वच पोलीस अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर निःस्वार्थपणे काम करीत आहेत.

कोरोनाचा संसर्ग होण्याच्या भीतीने प्रत्येक जण स्वतःची काळजी घेत असून, घरातच राहत आहे. पोलीस त्यास अपवाद आहेत. स्वतःचा जीव धोक्यात घालून आलेल्या परिस्थितीला सामोरे जात पोलिसांनी सामाजिक सुरक्षेचा विडा उचलला आहे. सध्या संपूर्ण जगाला हैराण करून सोडणाऱ्या कोरोनाशी मुकाबला करायची जबाबदारी सगळ्यांचीच आहे. संपूर्ण देशात लॉकडाऊनचे आदेश असूनही बारामती तालुक्यात काही 'टगे' केवळ हिंडण्याकरता बाहेर पडून पोलिसांची डोकेदुखी वाढवण्याचं काम करत आहे.

पोलीस त्यांच्याप्रमाणे परिस्थिती हाताळत आहेत. कधी प्रेमाने, तर कधी कडक शिस्तीचा धाक दाखवून या टवाळखोरांना वेळप्रसंगी चांगलाच 'प्रसाद' देण्याचं काम करत आहेत. मात्र या सध्याच्या भयभीत वातावरणात त्यांना कायदा-सुव्यवस्था राखताना जनतेच्या रोषालाही सामोरे जावं लागत आहे. मात्र, तरीही बारामतीचे सर्व पोलीस प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत आहेत. याबाबत बारामतीच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाने ताकवणे यांचे कौतुकास्पद अभिनंदन केले.

टॅग्स :BaramatiबारामतीPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्याFamilyपरिवारPuneपुणे