पुणे : पुणेरेल्वे स्थानकावर खराब पदार्थ विक्री होत असल्याचे समोर आल्यानंतर रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यांनी आयआरसीटीसी व रेल्वे अधिकाऱ्यांना जाब विचारला. तसेच, पुणे व शिवाजीनगर रेल्वे स्थानकावरील हॉटेलच्या किचनची पाहणी केली.
पुणे रेल्वे स्थानकावर एका स्टॉल विक्रेत्याकडून खराब वडापाव विक्री केली जात असल्याचे समोर आले होते. पुणे ग्रामीण रेल्वे प्रवासी संघाच्या सदस्यांनी त्या स्टॉलधारकाचा व्हिडीओ काढून सोशल मीडियावर टाकला होता. खराब पदार्थाची विक्री होत असताना आयआरसीटीसी व रेल्वे प्रशासनाकडून काहीही पाहणी केली जात नव्हती. हा एक प्रकारे प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू होता.