शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Pune: जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याकडून पिस्तूल विक्री; पिस्तुलासह तीन काडतुसे जप्त

By नितीश गोवंडे | Updated: March 1, 2024 15:43 IST

याप्रकरणात न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. नगर जिल्ह्यातील विसापूर खुल्या कारागृहात तो शिक्षा भोगत होता...

पुणे : कारागृहातून संचित रजा (पॅरोल) मिळवून बाहेर आलेल्या कैद्याला पिस्तूल विक्री करताना गुन्हे शाखेने पकडले. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि तीन काडतुसे जप्त करण्यात आली. प्रदीप उर्फ शप्पू जनार्दन कोकाटे (३४, रा. वाघ मळा, विठ्ठलवाडी, अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. कोकाटेने २०१४ साली अहमदनगर परिसरात एकाचा खून केला होत.

याप्रकरणात न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. नगर जिल्ह्यातील विसापूर खुल्या कारागृहात तो शिक्षा भोगत होता. कारागृह प्रशासनाकडून त्याने संचित रजा मिळवली होती. संचित रजा मिळवून तो बाहेर पडला. रजा संपल्यानंतर तो कारागृहात परतला नाही. कोकाटे कोंढव्यातील खडी मशीन चौकात पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथकातील पोलीस हवालदार खरपुडे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला सापळा लावून पकडले. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि तीन काडतुसे जप्त करण्यात आली. त्याच्याविरुद्ध बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती कारागृह प्रशासनाला देण्यात आली आहे.

ही कामगिरी गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अजय वाघमारे, सहायक निरीक्षक पाडवी, खरपुडे, रामाणे, लोखंडे, सपकाळ, इंगळे यांच्या पथकाने केली.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी