शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

अस्तित्वात नसलेल्या जमिनीची विक्री, १३ फेब्रुवारीपासून आंदोलनाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 01:44 IST

पुण्यासारख्या शहरात राहायला महागडे घर घेणे परवडत नाही म्हणून पुण्याबाहेर लगतच्या भुकूमसारख्या गावात थोडीशी जमीन घेऊन विनाशेती परवाना घेऊन घर बांधण्याचे स्वप्न अनेक सामान्य कुटुंबातील लोक बघतात

भूगाव - पुण्यासारख्या शहरात राहायला महागडे घर घेणे परवडत नाही म्हणून पुण्याबाहेर लगतच्या भुकूमसारख्या गावात थोडीशी जमीन घेऊन विनाशेती परवाना घेऊन घर बांधण्याचे स्वप्न अनेक सामान्य कुटुंबातील लोक बघतात; पण अशा कुटुंबांना फसवून लुटण्याचे प्रकार करणाऱ्या भूमाफियांचा सुळसुळाट मुळशी तालुक्यात झाला आहे. खरेदीला ६ वर्षे होऊनदेखील अजूनही जागेचा उपभोग घेता येत नाही,अशी स्थिती झाली आहे. ३५ जागाधारकांची त्यामुळे फसवणूक झाली आहे.गट नं. १२४ मधील सर्व प्लॉटधारकांची फसववणूक केलेली आहे. सातबारा उतारावर १४६ आर जागा असताना वर्ष २०१२ व २०१३ मध्ये तब्बल १७५.३ आर म्हणजे २९.३ आर या अतिरिक्त म्हणजे अस्तित्वात नसलेल्या जागेची विक्री केलेली आहे. या जागाधारकांनी शासनाला सुमारे ५० लाख रुपये महसूल भरला आहे. त्याचे सहायक निबंधकांकडे शासनाला महसूल भरून बेकायदेशीर दस्त झाले आहेत. भूगाव येथील तलाठी कार्यालयातदेखील उशिरा व बेकायदेशीरपणे झालेल्या खरेदीपत्रांची नोंद ही त्याआधीच्या कायदेशीर खरेदीपत्राआधी केली आहे.जोपर्यंत सर्व बेकायदेशीर व्यवहार पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत एकाही खरेदीधारकाचे नाव सात-बारा उतारावर लावले नाही. जाणूनबुजून सातबारा उतारावर नोंद घालण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लावला, तोपर्यंत सर्व बेकायदेशीर व्यवहार बिनबोभाटपणे पूर्ण केले गेले. अनेक जणांकडे कायदेशीर खरेदीपत्र असूनदेखील जागा नाही, बेकायदेशीर खरेदीपत्रधारकांच्या ताब्यात जागा, परिणामी वारंवार वादविवाद, सतत रस्त्याची अडवणूक, जागेवर अनेकदा नामचिन गुंडांचा वावर, धमकावणे, दहशत अशा छळवणुकीला सामोरे जावे लागत आहे. खरेदीला ६ वर्षे होऊनदेखील अजूनही जागेचा उपभोग घेता येत नाही,अशी स्थिती झाली आहे. ३५ जागाधारकांची त्यामुळे फसवणूक झाली आहे. १ कोटी १६ लाख रुपयांच्या फसवणुकीचा व ३५ जागाधारकांच्या रस्त्याच्या अडवणुकीचा ठपका ठेवत गुन्हा नोंदवला आहे.मुळशी तालुक्यातील महसूल अधिकाºयांच्या संगनमताशिवाय एवढा मोठा गुन्हा करणारे मोकाट फिरणे अशक्य आहे. वारंवार अर्ज विनंती करूनही भूमाफियांना संरक्षण देणाºया महसूल प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांची चौकशी करून कारवाई केली जावी या मागणीसाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोनदा आंदोलन करण्यात आले. अधिकाºयांची चौकशी करण्याची मागणी माननीय जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दि. २७ आॅगस्ट २०१८ रोजी मान्य केली होती. पण गेल्या पाच महिन्यांत याबाबत कोणतीही कारवाई झालेली नाही. जर माननीय जिल्हाधिकारी यांनी असंवेदनशीलता दाखवत कारवाई करण्यास अजूनही टाळाटाळ केली, तर दिनांक १३ फेब्रुवारी २०१९ पासून उपोषण आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय देशमुख, डॉ अभिजित मोरे, मंदार देहेरकर, जयंत गंधे, शेखर गौरशेटे, भगवान पडवळ, आनंत काळंबे, समीर सोनवणे, किरण घोलप, सिध्देश्वर शिंदे व इतर जागाधारकांच्या वतीने देण्यात आला.या दरम्यान एका दुसºया तक्रारीमध्ये मुळशी तालुक्याचे तहसीलदार सचिन डोंगरे, भूगाव तलाठी यांच्यावर भ्रष्टाचारविरोधी पथकाने कारवाई केली आहे. यावरून मुळशी तालुक्यातील महसूल यंत्रणा भ्रष्टाचारात बुडाली असल्याचे स्पष्ट होते. प्रशासनातील भ्रष्ट अधिकारी-कर्मचारी यांच्यावर कारवाई करायला जिल्हाधिकारी कार्यालय का टाळाटाळ करतंय, हा प्रश्न आंदोलनकारी जागाधारक विचारत आहेत.

टॅग्स :Puneपुणे