विद्यापीठातील वेतन निश्चिती रखडली

By Admin | Updated: June 21, 2016 00:39 IST2016-06-21T00:39:48+5:302016-06-21T00:39:48+5:30

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करताना शैक्षणिक अर्हता उंचविण्यात आली आहे. त्यामुळे तब्बल २०० कर्मचाऱ्यांच्या पद निश्चितीचा व वेतन निश्चितीचा प्रश्न निर्माण झाला

The salary of the university is fixed | विद्यापीठातील वेतन निश्चिती रखडली

विद्यापीठातील वेतन निश्चिती रखडली

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करताना शैक्षणिक अर्हता उंचविण्यात आली आहे. त्यामुळे तब्बल २०० कर्मचाऱ्यांच्या पद निश्चितीचा व वेतन निश्चितीचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुणे विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयाने या भरतीमध्ये काही त्रुटी काढल्या आहेत. मात्र, विद्यापीठाने सर्व पदांची भरती नियमानुसारच राबविली असल्याचे विद्यापीठाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव यांच्या कार्यकाळात विद्यापीठात नोकरभरती घोटाळा उघडकीस आला होता. त्यामुळे विद्यापीठातील नोकरभरती नियमानुसार व पारदर्शकपणे करण्याचे विद्यापीठासमोर मोठे आव्हान होते. विद्यापीठाने २०१३ मध्ये सुमारे २१० शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया राबविली. मात्र, ही भरती प्रक्रिया राबविताना उमेदवारांची शैक्षणिक अर्हता अधिक ठेवण्यात आली. त्यामुळे पदनिश्चिती व वेतन निश्चितीबाबत अडचणी येत असल्याचे पुणे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. विजय नारखेडे म्हणाले, की विद्यापीठ कायद्यातील परिनियम ५/११ नुसार पुणे विद्यापीठाने भरती प्रक्रिया राबविणे आवश्यक होते. कायद्यातील परिनियमानुसार शासनाच्या पूर्वपरवानगीने अध्यापकेतर, कुशल प्रशासनिक, लिपिकवर्गीय आणि इतर पदे निर्माण करणे व त्यांची अर्हता आणि वेतननाम विहित करणे आणि त्या पदांवर नियुक्ती करणे आवश्यक आहे. मात्र, २0१३ मधील पदभरती करताना शैक्षणिक अर्हता उंचविण्यात आली. त्यासाठी विद्यापीठाने परिनियम तयार करणे अपेक्षित होते. त्यामुळे वेतन निश्चितीची प्रक्रिया थांबविण्यात आली, त्याबाबत उच्च शिक्षण सचिवांबरोबर बैठक घेण्यात आली आहे. त्यांच्याकडे हा विषय प्रलंबित आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The salary of the university is fixed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.