उसने दिलेले पैसे मागितल्यामुळे सख्ख्या बहिणीला बेदम मारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:09 IST2021-07-10T04:09:23+5:302021-07-10T04:09:23+5:30

पुणे : पन्नास हजारांची दिलेली रक्कम परत मागितल्याने बहिणीनेच नवरा आणि एकाच्या सहकार्याने सख्ख्या बहिणीला बेदम मारले. ...

Sakhya beat her sister to death for asking for money | उसने दिलेले पैसे मागितल्यामुळे सख्ख्या बहिणीला बेदम मारले

उसने दिलेले पैसे मागितल्यामुळे सख्ख्या बहिणीला बेदम मारले

पुणे : पन्नास हजारांची दिलेली रक्कम परत मागितल्याने बहिणीनेच नवरा आणि एकाच्या सहकार्याने सख्ख्या बहिणीला बेदम मारले. वडगाव बुद्रूकमधील रायकर वस्तीवर ही घटना घडली. याप्रकरणी बाबासाहेब वाघमारे, मंदाकिनी बाबासाहेब वाघमारे (दोघेही रा. रायकरमळा, वडगाव बुद्रूक) आणि खंडू दगडू हजारे (वय २१, रा. नऱ्हेगाव) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सविता सिद्धेश्वर सुरवसे (वय ३०) यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

सविता आणि मंदाकिनी सख्ख्या बहिणी आहेत. काही दिवसांपूर्वी सविताने मंदाकिनीला ५० हजार रुपये उसने दिले होते. त्यातील ४० हजार रुपयेच परत देणार, असे मंदाकिनीने बहीण सविताला सांगितले. त्यावरून त्यांच्यात भांडण जुंपले. भांडणाचा राग आल्यामुळे सविताने नवरा बाबासाहेब आणि खंडूला बोलावून घेतले. त्यांनी सविताला दांडक्याने बेदम मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी पोलीस हवालदार नावडकर तपास करीत आहेत.

--------------

Web Title: Sakhya beat her sister to death for asking for money