सख्खा भाऊ पक्का वैरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:15 IST2021-02-23T04:15:16+5:302021-02-23T04:15:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सखा भाऊ पक्का वैरी याचा अनुभव अनेकदा येत असतो. पुण्यात दोघा हॉटेल व्यवसायिकांच्या भांडणावरून ...

Sakha bhau pukka vairi | सख्खा भाऊ पक्का वैरी

सख्खा भाऊ पक्का वैरी

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : सखा भाऊ पक्का वैरी याचा अनुभव अनेकदा येत असतो. पुण्यात दोघा हॉटेल व्यवसायिकांच्या भांडणावरून याचा प्रत्यय आला. याप्रकरणी डेक्कन पोलिसांकडे हेमंत आनंदा पाटील (रा. तारांगण सोसायटी, रायकरनगर, धायरी) यांनी फिर्याद दिली असून त्यावरुन पोलिसांनी त्यांचा भाऊ नीलेश आनंदा पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हे दोघेही सख्ख्ये भाऊ असून ते हाॅटेल व्यावसायिक आहेत. घोले रोडला दोघांचे एकमेकांशेजारी हॉटेल आहेत. गिऱ्हाईक आपल्याकडे ओढून घेतो, या कारणावरून त्यांच्यात शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता भांडणे झाली. तेव्हा नीलेश याने हातात असलेल्या पूल खेळण्याच्या मागील बाजूची अर्धवट स्टिक हेमंत यांच्या डोक्यावर, कानावर, हातावर मारून जखमी केले. हेमंत व त्यांच्या हॉटेल कामगारांना शिवीगाळ केली. त्याने हेमंत याला तुझा कॅफे जाळून टाकीन, शहाणा बनू नकोस, नाहीतर तुला संपवायला वेळ लागणार नाही, अशी धमकी दिली.

Web Title: Sakha bhau pukka vairi