शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

हितसंबंधांसाठी ‘बिम्सटेक’- केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2018 01:46 IST

दहशतवाद, अमली पदार्थांची तस्करी, सायबर क्राइम, एकमेकांमधील संबंध अधिक बळकट करण्यासाठी ‘बिम्सटेक’चे आयोजन केले होते.

पुणे : दहशतवाद, अमली पदार्थांची तस्करी, सायबर क्राइम, एकमेकांमधील संबंध अधिक बळकट करण्यासाठी ‘बिम्सटेक’चे आयोजन केले होते. कोणत्याही देशाला आपण किती शक्तिशाली आहोत, हे दाखवून देण्यासाठी हा युद्धसराव केलेला नाही. केवळ शेजारील देशांसोबतच्या हितसंबंधाचे संरक्षण व्हावे, ते चांगले राहावेत आणि सर्वांनी मिळून दहशतवादाचा सामना करावा, हा ‘बिम्सटेक’चा आणि या सरावाचा मूळ हेतू असल्याचे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी केले.दहशतवादाला आळा घालण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून बिम्सटेक (बे आॅफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टिसेक्टरल अ‍ॅण्ड इकॉनॉमिकल कॉपोर्रेशन) या संघटनेतील सात देशांच्या ‘मिलेक्स १८’ या संयुक्त युद्ध सरावाच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. ‘बिम्सटेक’तर्फे पहिल्यांदाच औंध मिलिटरी स्टेशन येथे १० ते १६ सप्टेंबर दरम्यान हा युद्धसराव घेतला. यामध्ये नेपाळ व थायलंड यांनी सहभाग घेतला नाही. त्यामुळे पाच देशांनी हा युद्धसराव केला. त्याचा समारोप आज झाला. या वेळी आर्मी कमांडट इन चीफ जनरल बिपीन रावत, दक्षिण मुख्यालयाचे कमांडिंग इन चीफ लेफ्टनंट जनरल डी. आर. सोनी, बिम्सटेकचे सचिव शाहिद्दूल इस्लाम व भुतान, म्यानमार, श्रीलंका, बांगलादेश देशांचे आर्मीचे अधिकारी उपस्थित होते.भामरे म्हणाले, दहशतवाद ही केवळ एकाची समस्या नसून, सर्व जगात हा पसरलेला आहे. त्यामुळे त्याचा सामना करण्यासाठी एकत्र येऊन लढणे योग्य ठरणार आहे. म्हणूनच भारताने पहिल्यांदाच बिम्सटेक देशांसाठी हे युद्धसरावाचे आयोजन केले. यामध्ये सहभागी झालेल्या देशांबाबत या युद्धसरावामुळे चांगले संबंध प्रस्थापित होणार आहेत.दहशतवादाचा सामना करण्यासाठी हे ‘मिलेक्स १८’ अत्यंत उपयोगी ठरणारे आहे. या सरावामुळे प्रादेशिक हितसंबंध अधिक बळकट होण्यास मदत मिळणार आहे. तसेच कृषी विकास, टेक्नॉलॉजी, आपत्ती व्यवस्थापन, दहशतवाद, गरिबी याचाही आपल्याला एकत्रितपणे विचार करता येणार आहे.रावत म्हणाले, देशांचा एकत्रित युद्धसराव घेण्यासाठी भारताने पुढाकार घेतला होता. अशा प्रकारचा सराव इतर देशही घेऊ शकतील. वर्षातून एकदा किंवा दोनदा संयुक्त युद्धसराव करण्याचा विचार सुरू आहे.शिवनेरी गावात दहशतवाद्यांचा थरारसहा दिवसांच्या युद्धसरावासाठी शिवनेरी गावाची निर्मिती केली होती. यामध्ये व्हाइट हाऊस,ग्रीन हाऊस, ब्राऊन हाऊस, प्री-स्कूल आदीं इमारती तयार केल्या होत्या. त्या ठिकाणी दररोजयुद्धसराव होत होता. आज या गावात घुसलेल्या दहशतवाद्यांवर कशा प्रकारे मात केली, त्याचे प्रात्याक्षिक दाखविण्यात आले.घरांमध्ये दहशतवादी घुसल्यानंतर बांगलादेशआर्मीने सर्व गावकऱ्यांना एकत्र केले आणि दहशतवाद्यांचा शोध घेऊन त्यांना कंठस्नान घातले. या वेळी हेल्किॉप्टरमधून जवानांनी मारलेल्या उड्या, दहशतवाद्यांना घातलेल्या गोळ्या, बॉम्बशोधक पथकाकडून घेतलेला शोध आदींमुळे थरारक गोष्टींचा अनुभव घेता आला.नेपाळलाही प्रादेशिक सहकार्याची गरज आहेचनेपाळ या युद्धसरावात सहभागी झाला नाही, याबाबत सुभाष भामरे म्हणाले, यापूर्वी नेपाळमध्ये बिम्सटेकची परिषद झालेली होती. पण आपण आयोजित केलेल्या युद्धसरावात ते सहभागी होऊ शकले नाहीत. त्यांनी त्यांचे निरीक्षक पाठविलेले होते. परंतु, काही कारणास्तव ते प्रत्यक्ष सरावात सहभागी झाले नाहीत. प्रत्येक देशाला प्रादेशिक सहकार्याची गरज आहे. तशी त्यांनाही आहे. त्यांनी सरावात सहभाग न घेतल्याने संबंध बिघडले असे नाही.

टॅग्स :Indian Armyभारतीय लष्करNepalनेपाळBhutanभूतानBangladeshबांगलादेशterroristदहशतवादी