शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
5
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
8
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
9
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
10
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
11
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
12
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
13
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
14
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
15
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
16
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
17
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
18
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
19
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
20
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले

संत सोपानकाका महाराजांच्या पादुकांचे पंढरीकडे प्रस्थान; मंदिराच्या आवारात टाळ - मृदंगाचा गजर अन् भाविकांकडून पुष्पवृष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 17:37 IST

शिवशाही बसमध्ये निमंत्रित चाळीस वारकऱ्यांसमवेत पोलीस बंदोबस्तात पंढरीला रवाना झाल्या आहेत

ठळक मुद्दे पालखीचा मार्ग सासवड निरा, बारामती, लासुर्णे,अकलूज,भंडी - शेगाव, वाखरी (पंढरपूर) असा एकूण १८० कि.मी चा प्रवास असणार

सासवड: ''माझिया वडिलाची मिरासि गा, देवा तुझी चरणसेवा बा पांडुरंगा" हा अभंग होऊन सकाळी नऊ वाजता संत सोपानकाका महाराजांच्या चल पादुकांनी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. मंदिर प्रदक्षिणा झाल्यावर श्री संत सोपान महाराजांच्या पादुका शासनाकडून पालखी प्रवासासाठी देण्यात आलेल्या दोन्ही विशेष शिवशाही बसमध्ये निमंत्रित चाळीस वारकऱ्यांसमवेत पोलीस बंदोबस्तात पंढरीला रवाना झाल्या आहेत. यावेळी भाविकांनी पुष्पवृष्टी केली तसेच रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या. 

६ जुलैला समाजआरती करून चल पादूकांचा प्रस्थान सोहळा पार पडला होता.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालखी सोहळा मंदिरातच विसावला होता. तर पालखी कालावधीतील नित्यनियम मंदिरात सुरू ठेवण्यात आले होते. शासनाच्या आदेशानुसार केवळ ४० लोकच पादुका घेवून पंढरपूरकडे जाणार असल्याने त्या दृष्टीने देवस्थानच्या वतीने तयारी करण्यात आली होती.

पालखीचा मार्ग सासवड निरा, बारामती, लासुर्णे, अकलूज, भंडी - शेगाव, वाखरी (पंढरपूर) असा एकूण १८० कि.मी चा प्रवास असणार आहे. ​संत सोपानदेव मंदिरात नित्यनियमाप्रमाणे पहाटे ४ वा काकडा आरती करून समाधीस महाभिषेक घालण्यात आला. मंदिर प्रदक्षिणा झाल्यावर पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. पालखी प्रस्थान सोहळ्याप्रसंगी पुरंदरचे आमदार संजय जगताप, प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, तहसिलदार रूपाली सरनोबत, पालखी सोहळा प्रमुख त्रिगुण गोसावी, आदी उपस्थित होते.

टॅग्स :PuneपुणेAshadhi Ekadashiआषाढी एकादशीSant Bhikaji Maharaj Mandirसंत भिकाजी महाराज मंदिरsant tukaram palkhiसंत तुकाराम पालखीsant dnyaneshwarसंत ज्ञानेश्वर