पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
By Admin | Updated: June 12, 2017 01:50 IST2017-06-12T01:50:05+5:302017-06-12T01:50:05+5:30
नळस्टॉप चौकातील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी वाहतूक शाखेने कर्वे रोड, लॉ कॉलेज रोडवरील वाहतूक चक्राकार पद्धतीने राबविण्याचा निर्णय घेतला आहे़

पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : नळस्टॉप चौकातील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी वाहतूक शाखेने कर्वे रोड, लॉ कॉलेज रोडवरील वाहतूक चक्राकार पद्धतीने राबविण्याचा निर्णय घेतला आहे़ वाहतुकीतील बदल येत्या सोमवारपासून (दि. १२ जून) प्रायोगिक तत्त्वावर अंमलात येणार आहे़ या बदलामुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी मोठी कसरत
करावी लागणार असल्याने, या बदलाला पादचारी प्रथम यांनी आक्षेप घेतला आहे़
कर्वे रोडवरून डेक्कन जिमखान्याकडे जाणारी वाहतूक कालवा रस्त्यावर वळविण्यात येणार असून, तेथून वाहनचालकांना आठवले चौकातून नळस्टॉपकडे किंवा प्रभात रोडकडे जाता येणार आहे़ तसेच, सेनापती बापट रोडवरून येऊन कोथरूडकडे जाणाऱ्या वाहनांना
प्रभात रोड जंक्शनला डावीकडे
वळून कालवा रोडला उजवीकडे वळून आठवले चौकातून नळस्टॉपकडे
जाता येणार आहे़ या चक्राकार वाहतुकीमुळे या रस्त्यांवरील वाहतुकीची कोंडी कमी होऊन वाहनांचा वेग वाढणार आहे़
पादचारी प्रथमचे प्रशांत इनामदार यांनी सांगितले की, बदलाची अंमलबजावणी करण्यापूर्वी पादचाऱ्यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता येईल, याची सोय करण्याची आवश्यकता आहे़