शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मार्केटयार्डातील सुरक्षा वा-यावर; चोर्‍यांचे प्रमाण वाढले, समितीचे बाजाराकडे मात्र दुर्लक्ष

By अजित घस्ते | Updated: May 14, 2023 17:55 IST

मार्केटयार्डात शेतमाल चोर्‍यांसह, गाळ्यांवर गांजा, दारू पिणे, सीसीटिव्ही कॅमेर्‍यांच्या तोडफोडीच्या घटना वारंवार घडतात

पुणे : मार्केटयार्डातील फळे-भाजीपाला, गुळ भुसार बाजारात चोर्‍यांचे प्रमाण वाढले असून दररोज शेतमालाच्या चोर्‍या होत आहेत. शनिवारी मार्केटयार्ड बंद असते. त्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी रात्री च्या सुमारास अक्षरशः आंबे पेटी चोरून नेली. अशा चोरीच्या घटना मार्केट यार्ड आवाजात वारंवार घडत आहेत. याचा फटका शेतकरी, आडत्यांना बसत आहे. त्यामुळे मार्केटयार्डातील सुरक्षेतिचा प्रश्न ऐरणीवर असून सध्या येथील सुरक्षा वा-यावर असल्याचे चित्र बाजारात दिसत आहे. त्यामुळे येथील सुरक्षा रक्षक वाढवून शेतकरी, व्यापारी आणि ग्राहक यांच्या सुरक्षितेसाठी आता निवडून आलेल्या संचालकांनी याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. मार्केटयार्डात शेतमाल चोर्‍यांसह, गाळ्यांवर गांजा, दारू पिणे, सीसीटिव्ही कॅमेर्‍यांच्या तोडफोडीच्या घटना वारंवार घडतात. आता नजीकच्या काळात गुळ भुसार बाजारात नेहरू रस्त्यावरील दोन दुकाने फोडली गेली. त्यापैकी एका दुकानातुन सुमारे ३० हजार रूपयांची तर, दुस-या दुकानातून तीन लाखांची चोरी झाली होती. गेल्या आठ दिवसापुर्वी पान शॉप फोडून ५० ते ६० हजार रोख रक्कमसह मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. याबाबत संबंधितांनी पोलीसांत तक्रारी दिल्या आहेत. दुसरीकडे फळे भाजीपाला बाजारात गाळ्यांवरून भाजीपाल्यासह आंबा, सफरचंदाच्या पेट्यांच्या पेट्या लंपास केल्या जात आहेत. बाजारात दररोज वाहतुककोंडी होत असताना बाजारातील सुरक्षा रक्षक जागेवर नसतात. मात्र, मेस्को कर्मचार्‍यांकडे हजेरीपुरते वेळेवर असतात की काय असा प्रश्न उपस्थित गेला जात  आहे. त्यामुळे मार्केटयार्ड बाजार आवारातील सुरक्षा व्यवस्था सुधारणा का? असा प्रश्न बाजार घटकांना पडत आहे.

''बाजारात चोर्‍या वाढल्या असून चोर्‍या करणार्‍यांचे चेहरे सीसीटीव्ही कॅमेरेत स्पष्ट दिसतात. चोरांच्या दहशतीमुळे कोणही कारवाई करत नाही. चोरी केलेला शेतमाल गेटच्या बाहेर नेताना सुरक्षा रक्षक त्यांना हटकत नाही. सध्या एका आंब्याची पेटी चार ते पाच हजार रूपयांची आहे. यामध्ये शेतकरी आणि आडत्यांचे नुकसान होत आहे. मोठा खर्च करूनही बाजाराची सुरक्षा उपयोगाची आहे का असा प्रश्न पडतो. - युवराज काची, माजी उपाध्यक्ष, आडते असोसिएशन.'' 

''बाजारातील चोर्‍यांच्या घटनांच्या पार्श्वभुमीवर रात्रीची गस्तीसाठी फिरते वाहन ठेवण्यात आले आहे. सुरक्षा व्यवस्थेमध्ये आवश्यक त्या सुधारणा लवकरच केल्या जातील. - डॉ.राजाराम धोंडकर, सचिव, बाजार समिती पुणे.'' 

टॅग्स :PuneपुणेMarket Yardमार्केट यार्डfruitsफळेGovernmentसरकारPoliceपोलिस