साध्वी प्रज्ञासिंह यांना मिळालेले ‘ते’ पत्र पुण्यातून!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 04:01 IST2020-01-15T04:01:12+5:302020-01-15T04:01:40+5:30

साध्वी प्रज्ञासिंह यांना पाठविण्यात आलेले हे पत्र उर्दू भाषेत आहे़ पत्रासोबत दोन पुड्यांमध्ये पांढºया रंगाची पावडर आहे़ या पावडरला हात लावल्यामुळे खाज सुटत असल्याचे तपासात समोर आले आहे़

Sadhvi Pragya Singh received the letter from Pune! | साध्वी प्रज्ञासिंह यांना मिळालेले ‘ते’ पत्र पुण्यातून!

साध्वी प्रज्ञासिंह यांना मिळालेले ‘ते’ पत्र पुण्यातून!

पुणे : भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या भोपाळ येथील घरी पोस्टाद्वारे मिळालेले संशयास्पद पत्र हे पुण्यातून पाठविण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे़ या पत्रावर शिवाजी चौक, खडकी बाजार, खडकी, ता़ जिल्हा पुणे, महाराष्ट्र, इंडिया असा पत्ता दिला आहे़ स्वामी रामचंद्र अय्यर ईश्वरचंद असे पत्र पाठविणाऱ्याचा उल्लेख पत्रावर आहे़

याबाबत पुणे पोलिसांकडे कोणत्याही यंत्रणेने अद्यापपर्यंत संपर्क साधला नाही़ तसेच चौकशीबाबत तक्रार आलेली नाही़ तक्रार मिळाल्यास तपास करण्यात येईल, असे विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त मितेश घट्टे यांनी सांगितले़

साध्वी प्रज्ञासिंह यांना पाठविण्यात आलेले हे पत्र उर्दू भाषेत आहे़ पत्रासोबत दोन पुड्यांमध्ये पांढºया रंगाची पावडर आहे़ या पावडरला हात लावल्यामुळे खाज सुटत असल्याचे तपासात समोर आले आहे़ या पाकिटातून पाठविलेल्या पत्रासोबत आणखी काही पाने असून त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या फोटोंचाही समावेश आहे़ त्यावर लाल पेनाने संशयास्पद खुणा करण्यात आलेल्या आहेत़ तसेच फोटोसमोर या सर्वांवर बंदुक रोखल्याचे चित्र आहे.

पुणे पोलिसांकडे अशा पत्राबाबत कोणत्याही यंत्रणेने अद्याप संपर्क साधलेला नाही. तसेच चौकशीसाठीही तक्रार आलेली नाही. अशी तक्रार मिळाल्यास त्या अनुषंगाने तपास करण्यात येईल, असे विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त मितेश घट्टे यांनी सांगितले.

Web Title: Sadhvi Pragya Singh received the letter from Pune!