शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावरील अनोळख्या व्यक्तींच्या हृदयाला 'ती'च्या रडण्याने पाझर फुटला;अन् त्या'नकोशी'ला पुन्हा नवा जन्म मिळाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2020 15:05 IST

या मुलीचा जन्म अवघे ३ ते ४ तासांपूर्वी झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

ठळक मुद्देबालिकेचे प्राण वाचले असून कोंढवा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला

पुणे (वानवडी) : नुकतेच जन्म झालेले बाळ रस्त्याच्या कडेला गवतात सोडून गेल्याची घटना उंड्री भागातील होलेवस्ती चौकात गुरुवारी रात्री घडली आहे. नवजात बाळ ही मुलगी असून तिच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार करुन ससून रुग्णालयात नेण्यात आले.मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास होलेवस्ती चौकात रस्त्याच्या कडेला थांबलेल्या व्यक्तींना लहान बाळ रडत असल्याचा आवाज आला. त्यांनी ही बाब ग्रामस्थ राजेंद्र भिंताडे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी कोंढवा पोलिसांना घटनास्थळी पाचारण केले.गवतात टाकलेल्या त्या नवजात बालिकेला नजीकच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यावेळी संकेत भिंताडे, पंकज कामठे, लक्ष्मण दिवेकर, प्रेम भिंताडे, अभिजीत भिंताडे, तुषार भिंताडे, विठ्ठल भिंताडे यांनी रुग्णवाहिका व बाळाला दवाखान्यात आणण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.डॉ. विनायक मासाळ यांनी प्राथमिक उपचार करत बाळाच्या अंगाला लागलेल्या मुंग्या साफ करुन दुध पाजले व ससून रुग्णालयात नेण्यात आले. या मुलीचा जन्म अवघे ३ ते ४ तासापूर्वी झाले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.बालिकेचे प्राण वाचले असून कोंढवा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक विनायक गायकवाड यांच्या सुचनेनुसार सहा. पोलीस निरिक्षक दादाराजे पवार हे बालिकेच्या आई वडिलांचा तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेWanvadiवानवडीPoliceपोलिस