शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रोच्या कामास रशियन कंपनी उत्सुक

By admin | Updated: August 14, 2015 03:06 IST

पुणे शहरातील मेट्रो प्रकल्प, कचरा व्यवस्थापन व रिंग रोड आदी पायाभूत सुविधा क्षेत्रांत काम करण्यास रशियातील सार्वजनिक कंपनी उत्सुक आहे

पुणे : पुणे शहरातील मेट्रो प्रकल्प, कचरा व्यवस्थापन व रिंग रोड आदी पायाभूत सुविधा क्षेत्रांत काम करण्यास रशियातील सार्वजनिक कंपनी उत्सुक आहे. या कंपनीचे अध्यक्ष दिमित्री दुबोविक यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासमोर कंपनीच्या कामाविषयी गुरुवारी सादरीकरण केले. यावेळी महापालिका आयुक्त कुणाल कुमार, पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश झगडे व जिल्हाधिकारी सौरव राव उपस्थित होते. रशियातील स्टार कंपनी पुण्यातील ऋतुजा बिल्डर्सच्या सहकार्याने पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात काम करण्यास इच्छुक आहे. त्यावेळी स्टार कंपनीचे अध्यक्ष शशांक सबनीस, संचालक अतुल उपाध्याय आणि ऋतुजा बिल्डसर्चे कार्यकारी संचालक अरुण पाटील उपस्थित होते. पुणे मेट्रो प्रकल्पासाठी जागतिक निविदा प्रक्रिया राबविण्यात यावी. रशियन कंपनीने कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी सविस्तर लेखी प्रस्ताव द्यावा, अशी सूचना बापट यांनी केली. (प्रतिनिधी)