मेट्रोच्या कामास रशियन कंपनी उत्सुक
By Admin | Updated: August 14, 2015 03:06 IST2015-08-14T03:06:27+5:302015-08-14T03:06:27+5:30
पुणे शहरातील मेट्रो प्रकल्प, कचरा व्यवस्थापन व रिंग रोड आदी पायाभूत सुविधा क्षेत्रांत काम करण्यास रशियातील सार्वजनिक कंपनी उत्सुक आहे

मेट्रोच्या कामास रशियन कंपनी उत्सुक
पुणे : पुणे शहरातील मेट्रो प्रकल्प, कचरा व्यवस्थापन व रिंग रोड आदी पायाभूत सुविधा क्षेत्रांत काम करण्यास रशियातील सार्वजनिक कंपनी उत्सुक आहे. या कंपनीचे अध्यक्ष दिमित्री दुबोविक यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासमोर कंपनीच्या कामाविषयी गुरुवारी सादरीकरण केले.
यावेळी महापालिका आयुक्त कुणाल कुमार, पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश झगडे व जिल्हाधिकारी सौरव राव उपस्थित होते. रशियातील स्टार कंपनी पुण्यातील ऋतुजा बिल्डर्सच्या सहकार्याने पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात काम करण्यास इच्छुक आहे. त्यावेळी स्टार कंपनीचे अध्यक्ष शशांक सबनीस, संचालक अतुल उपाध्याय आणि ऋतुजा बिल्डसर्चे कार्यकारी संचालक अरुण पाटील उपस्थित होते. पुणे मेट्रो प्रकल्पासाठी जागतिक निविदा प्रक्रिया राबविण्यात यावी. रशियन कंपनीने कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी सविस्तर लेखी प्रस्ताव द्यावा, अशी सूचना बापट
यांनी केली. (प्रतिनिधी)